विलेपार्ले येथील जैन मंदिरावर 5 मेपर्यंत कारवाई नाही
विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या उर्वरित बांधकामावर 5 मेपर्यंत कारवाई करू नये असे आदेश हायकोर्टाने पालिका प्रशासनाला दिले. दरम्यान या प्रकरणी पालिकेने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्यासमोर झालेल्या सुनावणी वेळी मंदिरावरील कारवाईनंतर वादाला तोंड फुटल्यामुळे त्यामागील काही कारणांबाबत पालिकेने माहिती दिली. न्यायालयाने ही माहिती ऐकून घेत वेळेअभावी या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. तसेच मंदिराच्या उर्वरित बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश कायम ठेवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List