संपूर्ण महाराष्ट्रात खंडणीखोरांचे साम्राज्य
बीड जिह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या खंडणीखोरांचे साम्राज्य आहे आणि त्याला थेट राजाश्रय आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. अनेक जिह्यांमध्ये येणाऱ्या औद्योगिक वसाहती हे त्यामागचे कारण आहे, असे ते म्हणाले.
पूर्वी राज्यात अंडरवर्ल्डचे राज्य होते, आता खंडणीखोरांनी त्याचा ताबा घेतला आहे, असे सांगतानाच, या खंडणीखोरांना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून तक्रारी थेट त्या विभागात येतील अशी व्यवस्था केली पाहिजे, असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List