Raid 2 OTT Release: अजय देवगण-रितेश देशमुखचा ‘रेड 2’ ओटीटीवर कधी अन् कुठे?
अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रेड 2' आज 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयीची माहिती समोर आली आहे.
'ई टाइम्स'च्या रिपोर्टनुसार 'रेड 2'ने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत डिजिटल रिलीजची डील केली आहे. थिएटरमध्ये अपेक्षित कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांना ऑनलाइन पाहता येईल. त्यामुळे ओटीटीवर हा चित्रपट जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला येऊ शकतो.
एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्याला सर्वसाधारणपणे 60 दिवसांचा अवधी दिला जातो. त्यानंतर तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जातो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List