“क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड…” पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतून नवी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी न्यूज 9 ने आयोजित WAVES Edition ग्लोबल समिटला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या प्रत्येक गल्लीत कहानी आहे. आपल्याकडे बरंच काही आहे. म्हणूनच म्हणतो यही समय है, सही समय क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्डसाठीची हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित शिखर परिषदेत ते बोलत होते.
प्रत्येक कहाणी भारतीय संस्कृतीचा आवाज बनून जगाच्या मनात बसली
आज १ मे आहे. आजपासून ११२ वर्षापूर्वी २ मे १९१३ रोजी भारतात पहिली फिचर फिल्म राजा हरिश्चंद्र रिलीज झाली होती. त्याचे निर्माते दादासाहेब फाळके होते. कालच त्यांची जयंती झाली. गेल्या एका दशकात भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात यश मिळवलं आहे. रशियात राज कपूर यांची लोकप्रियता, कानमध्ये सत्यजित रे यांची लोकप्रियेता. आणि ऑस्करमध्ये तेच दिसतं. गुरुदत्त यांची सिनेमॅटिक पोएट्री असो किंवा ऋत्विक घटक यांचं सोशल रिफ्लेक्शन असो. ए आर रहमान यांचं संगीत असो की राजामौलींची महागाथा असो प्रत्येक कहाणी भारतीय संस्कृतीचा आवाज बनून जगाच्या मनात बसली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आपण भारतीय सिनेमाच्या अनेक दिग्गजांना टपाल तिकिटाच्या माध्यमातून स्मरणात ठेवलं आहे. गेल्या काळात मी गेमिंग वर्ल्ड, फिल्ममेकर, अभिनेते, संगीतकारांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यात भारताची क्रिएटिव्हिटी आणि ग्लोबल कॉलोबोशनची चर्चा व्हायची. मी तुमच्याकडून आयडिया घ्यायचो. मलाही या विषयात खोलवर जाण्याची संधी मिळायची. मी एक प्रयोग केली. सहा सात वर्षापूर्वी मी गांधी जयंतीनिमित्ताने १५० देशातील गायक गायिकांना गांधींचं गीत गायला प्रेरित केलं. गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने जगभरातील गायकांनी ते गायलं. याचा परिणाम म्हणजे जग एकसाथ आलं. या ठिकाणी अनेक लोक आहेत. त्यांनीही त्यावेळी आपले दोन दोन तीन तीन मिनिटाचे व्हिडीओ केले होते. भारत आणि जगातील क्रिएटीव्ह लोक काय करू शकतो हे दाखवून दिलं. आज त्याच काळातील कल्पना वास्तवात आली आहे. जसा नवीन सूर्य उगवल्यावर आकाशाला रंग देतो. तसंच ही समिट आपल्या पहिल्या पर्वापासूनच चमकत आहे, असे प्रतिपादन मोदींनी केले.
आमच्या अडव्हायजरी बोर्डाच्या सर्व सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली आहे. ती दिसत आहे. तुम्ही क्रिएटर चॅलेंजची मोहीम हाती घेतली. जगातील ६० देशातून १ लाख क्रिएटिव्ह लोकांनी भाग घेतला. ८०० फायनलिस्ट निवडले गेले. मी सर्व फायनलिस्टला शुभेच्छा देत आहे. जगात छाप पाडण्याची, काही करून दाखवण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे. तुम्ही भारत पव्हेलियनमध्ये बरंच काही नवं केलं आहे. मला ते पाहायचं आहे. मी उत्सुक आहे. व्हेव बाजारातील इनिशिएटिव्ह महत्त्वाचं आहे. यातून नवे क्रिएटर तयार होतील. नव्या बाजाराला जोडले जातील. बायर्स आणि कलेक्टरला जोडण्याची सुरुवात चांगली आहे. जन्माला आलेल्या मुलाचं आईशी कनेक्शन असतं. त्याची सुरुवात अंगाईने होती. त्याला पहिला स्वर संगीताचा ऐकू येतो. आई मुलाचं स्वप्न निश्चित करते. तसंच व्हेवही क्रिएटिव्ह वर्ल्डचे लोक एक युगाचं स्वप्न तयार करतो. मी लालकिल्ल्यावरून सब का प्रयासचं आवाहन केलं होतं. आता मला विश्वास वाटत आहे. तुमचा प्रयत्न वेव्हला नवीन उंचीवर घेऊन जाईल. तुम्ही जशी पहिली समिट केली आहे. ती पुढेही कायम ठेवा. आता तर व्हेव्समध्ये अनेक सुंदर लाटा येणं बाकी आहेत. भविष्यात व्हेव्स पुरस्कार येतील. आर्ट इंडस्ट्रीतील हे सर्वात प्रतिष्ठीत अवार्ड असतील. आपल्याला जगाच्या मनाला जिंकायचं आहे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.
क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड
भारता थर्ड लार्जेस्ट इकोनॉमी बनत आहे. भारत ग्लोबल फिनटेक अडोप्शन रेटमध्ये नंबर वन आहे. जगातील सर्वात मोठा मोबाईल मॅन्युफॅक्चरर आहे. स्टार्टअप इको सिस्टिम भारतात आहे. विकसित भारताचा प्रवास आता सुरू झाला आहे. भारत बिलियन प्लस स्टोरीजचा देश आहे. २००० वर्षापूर्वी जेव्हा भरतमुनीने नाट्यशास्त्र लिहिलं. त्यांचा संदेश होता. कला संसाराला भावना देतात. इमोशन देतात. फिलिंग्ज देतात. शतकापूर्वी कालिदासने शाकुंतलम लिहिलं तेव्हा भारताने क्लासिकल ड्रामाला दिशा दिली. भारताच्या प्रत्येक गल्लीत कहानी आहे, प्रत्येक पर्वत गीत आहे. प्रत्येक नदी काहींना काही गात असते. देशातील ६ लाख गावात गेला तर त्यांचं एक फोक आहे. त्यांचं स्टोरी टेलिंगचा अनोखा अंदाज आहे. लोककथेच्या माध्यमातून विविध समाजाने इतिहास पुढे नेला आहे. संगीत ही आपल्यासाठी साधना आहे. गजल आणि भजन असो प्रत्येक सूरात कहाणाी आहे. प्रत्येक तालमध्ये आत्मा आहे. आपल्याकडे नाद ब्रह्माची कल्पना आहे. आपले ईश्वरही संगीत आणि नृत्याने अभिव्यक्त करतात. शंकराचं डमरू सृष्टीचा पहिला ध्वनी आहे. सरस्वतीची विणा विवेक आणि विद्येची लय आहे. श्रीकृष्णाची बासरी प्रेम आणि सौंदर्याचा अमर संदेश आहे, विष्णूचा शंख ध्वनी सकारात्मक ऊर्जेचं आवाहन आहे. बरंच काही आहे आपल्याकडे आहे. म्हणून म्हणतो यही समय है, सही समय क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्डसाठीची हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन मोदींनी केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List