उरणच्या अदानी व्हेंचर्स कंपनीत स्फोट; धुतूम गाव हादरले, ग्रामस्थ सैरावैरा पळाले.. अभियंता गंभीर जखमी

उरणच्या अदानी व्हेंचर्स कंपनीत स्फोट; धुतूम गाव हादरले, ग्रामस्थ सैरावैरा पळाले.. अभियंता गंभीर जखमी

उद्योगपती गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीत आज संध्याकाळी भीषण स्फोट झाला. नाफ्ताच्या टाकीची साफसफाई तसेच दुरुस्ती सुरू असताना ही दुर्घटना घडली असून त्यात एक तरुण अभियंता गंभीर जखमी झाला आहे. हा स्फोट एवढा भयानक होता की जवळचे धुतूम गाव अक्षरशः हादरले. अनेक ग्रामस्थ भीतीपोटी घरातून सैरावैरा पळाले. दरम्यान स्फोट आणि आग याची झळ बाजूच्या गावाला बसली असती तर मोठा अनर्थ घडला असता. या स्फोटाची चौकशी करावी, अशी मागणी धुतूमवासीयांनी केली आहे.

अदानी व्हेंचर्स कंपनीत पेट्रोल, डिझेल व नाफ्ता या अतिज्वलनशील रसायनांची साठवणूक केली जाते. आज संध्याकाळी सवापाचच्या सुमारास नाफ्ताच्या रिकाम्या टैंक नंबर 22 मध्ये साफसफाई तसेच दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. या टँकची क्षमता 30 हजार किलो लिटर एवढी आहे. काम सुरू असताना अचानक स्फोट झाला आणि एकच घबराट उडाली. या स्फोटामध्ये रोहित सरगर हा तरुण अभियंता गंभीर जखमी झाला असून त्याला नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल केले आहे.

ऑक्सिजन, सोडियम सल्फेट, नाफ्ताचा संपर्क झाला आणि..
अदानी व्हेंचर्स कंपनीतील नाफ्ताच्या टँकमध्ये सफाईचे काम सुरू असतानाच ऑक्सिजन, सोडियम सल्फेट, नाफ्ता यांचा संयुक्तपणे संपर्क झाला. त्यामुळे मोठा स्फोट होऊन आग लागली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली. दरम्यान या स्फोटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

माहिती देण्यास टाळाटाळ
उद्योगपती अदानी यांनी दोन वर्षांपूर्वी या कंपनीचा ताबा घेतला आहे. या आधी ही कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारित होती. कंपनीने कोणत्या परवानग्या घेतल्या याची माहिती मागवूनही ती देण्यास सतत टाळाटाळ होत असल्याची माहिती धुतूम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रेमनाथ ठाकूर यांनी दिली आहे. आजच्या स्फोटामुळे कंपनीतील कामगारांच्या तसेच ग्रामस्थांच्याही सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

WAVES 2025: ‘पुष्पा 2’ नंतर किती बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य ? पुष्पा ने थेट सांगितलं… WAVES 2025: ‘पुष्पा 2’ नंतर किती बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य ? पुष्पा ने थेट सांगितलं…
मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट सुरू झाले आहे. या चार दिवसांच्या कार्यक्रमात अनेक मोठे स्टार सहभागी होणार असून...
कथित गर्लफ्रेंड पलक तिवारीच्या भावासोबत इब्राहिम अली खानची मस्ती; व्हिडीओ व्हायरल
skincare tips : उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या….
IPL 2025 – पंजाब किंग्जच्या सुसाट गाडीला ब्रेक लागणार? महत्त्वाचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
लोकसभा- विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाला जाग, मतदार यादीबाबत घेतले मोठे निर्णय
पाच मित्र पोहत होते, अचानक दगडी विहीर कोसळली; तिघांना वाचवण्यात यश, दोघे ढिगाऱ्याखाली अडकले
ठरलं! ‘या’ मैदानावर रंगणार फायनलचा थरार, ICC ने केली मोठी घोषणा