भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्याचा मार्ग गुजरातमधून जातो – राहुल गांधी

भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्याचा मार्ग गुजरातमधून जातो – राहुल गांधी

भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्याचा मार्ग गुजरातमधून जातो, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोडासा जिल्ह्यातील अरवली येथे पोहोचले आहेत. यावेळी बीएपीएस स्वामीनारायण मंदिर सभागृहात जिल्ह्यातील बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, “सध्याची लढाई केवळ राजकीय नाही तर ती भाजप-आरएसएस आणि काँग्रेसमधील वैचारिक लढाई आहे. संपूर्ण देशाला माहित आहे की, जर कोणी भाजपला हरवू शकतो तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे. जर आपल्याला देशात आरएसएस आणि भाजपला पराभूत करायचे असेल तर तो मार्ग फक्त गुजरातमधून जातो.”

कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपल्या पक्षाची सुरुवात गुजरातमध्येच झाली. तुम्ही आम्हाला महात्मा गांधी आणि सरदार पटेल हे महान नेते दिले. बऱ्याच काळापासून गुजरातमध्ये आपल्या हाती फक्त निराशाच आली आहे. मात्र मी तुम्हाला खात्री देण्यासाठी आलो आहे की, काहीही कठीण नाही.”, असं म्हणत त्यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणूक जिकंण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या..’; सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’बद्दल काय म्हणाली ‘कोकण हार्टेड गर्ल’? ‘गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या..’; सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’बद्दल काय म्हणाली ‘कोकण हार्टेड गर्ल’?
‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलंय. केदार...
महेश मांजरेकरांकडून ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची घोषणा; ‘दृश्यम 2’ फेम अभिनेता शिवरायांच्या भूमिकेत
मलायका अरोराच्या अडचणीत मोठी वाढ, अजामीनपात्र वॉरंट जारी होण्याची शक्यता, नक्की काय आहे प्रकरण?
भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक; हानिया आमिर, माहिरा खान यांचे अकाऊंट्स बंद
Hair Care- केस धुतल्यानंतर तुम्हीसुद्धा ही चूक करताय? मग आजच थांबा
शेतीसाठीच्या आवर्तनानंतर मेअखेर मुळा धरण तळ गाठणार, आवर्तन 35 दिवस चालणार
पुणे शहरातील 323 रस्त्यांच्या रुंदीकरणास खो, शिवसेनेच्या भूमिकेचा विजय; प्रस्ताव रद्द होणार