Pahalgam Attack – नियंत्रण रेषेवर संघर्ष सुरू; पाकड्यांचा LoC वर रात्रभर गोळीबार, हिंदुस्थानी लष्कराचं चोख प्रत्युत्तर!

Pahalgam Attack – नियंत्रण रेषेवर संघर्ष सुरू; पाकड्यांचा LoC वर रात्रभर गोळीबार, हिंदुस्थानी लष्कराचं चोख प्रत्युत्तर!

जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर जगभरातील देशांनी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्थानला पाठिंबा दिला होता. दुसरीकडे देशभरातून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. अशात हिंदुस्थाननेही काही मोठे निर्णय घेत पाकड्यांची कोंडी केली. यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आगळीक करण्यास सुरुवात केली असून एलओसीवर रात्रभर गोळीबार केला. याला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पहलगाम येथील हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संबंध अधिक चिघळले आहेत. अशातच पाकिस्तानी सैन्याने काही ठिकाणी लहान शस्त्रांनी गोळीबार केला. शुक्रवारी रात्रभर हा गोळीबार सुरू होता. पाकिस्तानच्या या गोळीबाराला हिंदुस्थानी लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. या गोळीबारामध्ये अद्याप दोन्ही बाजूने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

बांदिपुरात चकमक

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम सुरू केली आहे. बांदीपुरा जिल्ह्यात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या जवानांनी शोधमोहीम तीव्र केली. शोधमोहीम सुरू असताना अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला. याला लष्कराने आणि पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला होता, परंतु उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या तंगमर्ग येथील जंगलामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले असून येथे चकमक सुरू आहे.

लष्करप्रमुखांचा दौरा

पहलगाम हल्ल्यानंतर तिन्ही सैन्यदलांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. अशातच लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे श्रीनगर आणि उधमपूरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते कश्मीर खोऱ्यामध्ये तैनात वरिष्ठ लष्करी कमांडर आणि इतर सुरक्षा संस्थांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील.

अ‍ॅक्शन घ्या, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा, आमचा पाठिंबा! देशाच्या सुरक्षेसाठी विरोधी पक्ष सरकारसोबत भक्कम

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तानचे नापाक इरादे; नागरी वस्तींवर ड्रोन हल्ले, फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनमुळे 3 जखमी; पोलिसांची माहिती पाकिस्तानचे नापाक इरादे; नागरी वस्तींवर ड्रोन हल्ले, फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनमुळे 3 जखमी; पोलिसांची माहिती
शुक्रवारी रात्री पंजाबमधील फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केल्यानंतर एकाच कुटुंबातील किमान तीन जण गंभीर जखमी झाले. तिघांपैकी एकाची...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर, पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाचा दावा
Heaalthy Lifestyle: कलिंगडासोबत चुकूनही या पदार्थांचे सेवन करू नये, अन्यथा…..
लोकशाही व संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ
Big Breaking India Pakistan War- पुन्हा एकदा पाकिस्तानचा हिंदुस्थानवर ड्रोन हल्ला
India Pakistan War- जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरु
Big Breaking India Pakistan War- पंजाब, पठाणकोट अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट