करण जोहरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्काच; म्हणाले, “झोंबीसारखा का चालतोय..जिंदा लाश”
बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांपासून ते अभिनेत्रींपर्यंत सर्वांचाच आपल्या हेल्थ,डाएट विशेषत: वजन कमी करण्याकडे कल आहे. त्यात सध्या चर्चा सुरु आहे ते फिल्म निर्माता करण जोहरच्या ट्रान्सफॉर्मेशनची. त्याने आपला लुक पूर्णपणे बदलला आहे. तो दिवसेंदिवस अजूनच बारीक होत चालला आहे. त्याच्या तब्येतील या बदलामुळे फॅन्स हैराण आणि चिंतित झालेत. चाहते त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. वजन कमी झाल्यामुळे त्याचा चेहराही खूपच बदलला आहे.
करणच्या तब्येतील या बदलामुळे फॅन्स हैराण
चाहत्यांच्या चिंतेला उत्तर देण्यासाठी करण जोहरने त्याच्या इंस्टाग्रामवर लाइव्ह येऊन सांगितले की, तो पूर्णपणे निरोगी आहे आणि आधीपेक्षा जास्त चांगले जीवन अनुभवत आहे.करण जोहर म्हणाला, ‘मी पूर्णपणे ठीक आहे. मी कधीही इतकं चांगलं अनुभवलं नाही.’ त्याने त्याच्या वजन कमी करण्यामागील कारण स्पष्ट केले. ब्लड टेस्ट केल्यानंतर, त्याला समजले की, त्याला आपले ब्लड लेवल सुधारावे लागेल. तो म्हणाली की, ” हे तेव्हा सुरू झाले जेव्हा मला जाणवलं की मला माझ्या रक्ताची पातळी सुधारावी लागेल. त्यासाठी औषधे घेत होतो. पण वजन कमी होण्याचं कारण दिवसातून मी एकदाच जेवण करतो.”. करण डाएटसोबतच पॅडलबॉल खेळत होता आणि स्विमिंग करत होता.
करणचा चेहरा अजूनच बारीक दिसत असून चाहत्यांना धक्काच
पण करणला त्याच्या बारीक झालेल्या तब्येतीवरून सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. करणचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तर चाहत्यांनी अजूनच चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडीओमध्ये करणचा चेहरा अजूनच बारीक दिसत आहे तर त्याची चालण्याची पद्धतही अतिशय विचित्र वाटत असल्याने चाहत्यांना धक्काच बसला आहे.
चेहऱ्यापासून ते चालण्यापर्यंत सगळंच बदललं
व्हायरल झालेला व्हिडीओ हा अयान मुखर्जीच्या घरा बाहेरील आहे. अयान मुखर्जीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा अख्खं बॉलिवूड उपस्थित होतं. तेव्हा करण देखील अयानला भेटण्यासाठी गेला होता. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि चर्चेत आला आहे ते त्याच्या तब्येतीमुळे.या व्हिडीओमध्ये करण घाई घाईत चालताना दिसत आहे तेव्हा त्याचा चेहरा अतिशय बारिक दिसत असून त्याचे गाल आत गेलेले दिसत आहे आणि त्याचे डोळेही वेगळेच वाटत आहेत. एवढंच नाही तर त्याचं चालणं देखील थोडं विचित्रच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक कमेंट्स येत आहेत.
“झोंबी सारखा चालतोय”
करणची ही अवस्था पाहून एकाने कमेंट केली आहे की, “हा असा का झोंबी सारखा चालतोय”, तर एकाने लिहिलं आहे की, “याच्याकडे पाहून त्याला कोणता आजार असल्यासारखं वाटतं आहे.” तर अनेकांनी म्हटलं आहे “करण एखाद्या जिंदा लाशसारखा दिसत आहे” अशा अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List