बाबील खानला झालंय तरी काय? रडतानाचा व्हिडीओ बघून इरफानच्या चाहत्यांना धक्का
दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबील खानने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये बाबील रडताना दिसत आहे. ‘बॉलीवूड वाईट आहे. बॉलीवूड ही एक अतिशय फेक इंडस्ट्री आहे,’ असे म्हणताना बाबील दिसतोय. बाबीलचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. काही वेळाने हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला. आता तर त्याने स्वतःचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. बाबील खानचे प्रोफाइल इन्स्टाग्रामवर दिसत नाही.
बाबील पहिल्या व्हिडीओमध्ये म्हणतो की, ‘शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजित सिंग असे बरेच लोक आहेत; अजून बरीच नावे आहेत, बॉलीवूड वाईट आहे. बॉलीवूड ही एक अतिशय फेक इंडस्ट्री आहे, ज्याचा मीदेखील एक भाग आहे.’ बाबीलने दुसऱ्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, ‘बॉलीवूड ही इंडस्ट्री खोटी आहे. काहींची अशी इच्छा आहे की, बॉलीवूड चांगलं व्हावं, पण ते मूर्खपणाचं आहे. माझ्याकडे तुम्हाला दाखवायला खूप काही आहे,’ असे बोलून बाबील जोरजोरात रडू लागला. बाबीलच्या टीमने आज निवेदन जारी केले. बाबीलच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, असे टीमच्या वतीने सांगण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List