‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार

‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.

शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.

“खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय” अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.

माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, माजी सभापती सुनीता गावडे आदी उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;