Category
Ajit Pawar
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... “भविष्यात निवडणूक लढेल की नाही, पण यावेळेला एक संधी द्या”, आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद
Published On
By Manisha Thorat- Pisal
महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. भविष्यात निवडणूक लढेल की नाही, सांगता येत नाही. परंतु यावेळी मला काम करण्याची संधी द्या. जी कामे अपुर्ण राहिली आहे. ती पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. असे आढळरावांनी एका सभेत म्हटलंय. “वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान
Published On
By Manisha Thorat- Pisal
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे. ‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू’; उपमुख्यमंत्री अजित पवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि.१० मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तोफ धडाडणार आहे. 'सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात'; मिटकरींचा हल्लाबोल
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 2018 साली मी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसंपर्क यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला होता. मला मी त्यांच्या सोबत आहे यांचा प्रचंड अभिमान होता. मात्र हा व्यक्ती केवळ पैशाचा मागे लागलेला आहे, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांची भूमिका करून त्यांना महाराजांचे विचार समजत नाहीत, उद्या पैशांसाठी ही व्यक्ती बहलोल खानाचीही भूमिका करेल अशी जहरी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली. “बिनकामाच्या खासदाराला आता घरी बसवा”, आढळरावांची सडकून टिका
Published On
By Manisha Thorat- Pisal
चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मंतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे माझ्यावर टीका करतात की, मी पालकमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे मतदारसंघासाठी निधी मागितला; मात्र मी दिला नाही असे ते खोटे बोलत आहेत. त्यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांना चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही, वाहतूक कोंडीत लोकांचे दोन दोन तास वाया जात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे. तुम्ही साहेबांचे सैनिक, वळसे साहेबांचा तुमच्यासाठी निरोप आलाय, आढळरावांना विजयी करा
Published On
By Manisha Thorat- Pisal
महायुतीतील अजित पवार गटातील बारामती, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच हे सर्व झाल्यानंतर अजित पवार गट आता आपला मोर्चा शिरूरकडे वळविणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आता अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. अशातच शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील मतदारांना आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच दिलीप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटलांनी देखील वळसे पाटलांना निरोप घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. बारामतीच झालं, आता शिरूरला जायचं! : अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंचं टेंशन..!
Published On
By Manisha Thorat- Pisal
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान पार पडणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगला आहे. महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनिता पवार या मैदानात आहेत. आज बारामती मध्ये पार पडलेल्या प्रचार सांगता सभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचा पाहायला मिळाल. सुरेंद्र पवार यांच्यासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी आता बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर शिरूर मध्ये सर्वांनी जायचंय, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. “कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट
Published On
By Manisha Thorat- Pisal
पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबत मोशी येथे केला. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बैंक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले.. भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच : आढळराव पाटील
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरूर लोकसभेतुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतीच भोसरी गावच्या यात्रा उत्सवात कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. यावेळी भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा निमित्त आयोजित कुस्तीचे थरार अनुभवले. प्रचंड संख्येने उपस्थित कुस्ती शौकिनांनी आढळराव पाटील यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. सक्षम उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच नावाची चर्चा
Published On
By Manisha Thorat- Pisal
राज्यात चौथ्या टप्यात होत असलेल्या लक्षवेधी लढतीमध्ये शिरूर लोकसभा मंतदारसंघांचा क्रमांक वरचा लागतो. या मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत असली तरी खरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे कारण इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगलेला आहे.