Category
Shivaji Adharao Patil
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... ‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे. मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला
Published On
By Manisha Thorat- Pisal
मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही. जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर दाखवत असतात, ती मी मंजूर केलेल्या प्रकल्पांची कामे आहेत. काम करणं अवघड आहे अन् कामाचा अभिनय करणं खूप सोप आहे. मागील 15 वर्ष काम मी केलं अन् मागील पाच वर्षात त्यांनी फक्त काम केल्याचा अभिनय केला. तुम्ही त्यांच्या भूल थापानां बळी पडू नका, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नागरिकांना केले. Shirur Lok Sabha Election: बैलगाडा शर्यत बंदी उठवली-कायदा केला; म्हणून महायुतीला देऊया साथ..!
Published On
By Manisha Thorat- Pisal
महाराष्ट्राची शेती-माती- संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला. बंदी उठवली आणि कायदा पारित केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह ग्रामीण महराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयात हा लढा यशस्वी झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. “तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर..,’आढळरावांचं मतदारांना आवाहन
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत बसणारा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले तर हे प्रश्न सुटतील, विकासकामे मार्गी लागतील, समोरच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे. मात्र याला जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल असा पलटवार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केला. Shirur Lok Sabha Election : शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपाचा ‘‘मास्टर ट्रोक’’
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ‘‘मास्टर स्ट्रोक’’ मारला असून, मतदार संघातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कवडे यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. “५ वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या ? कुठे जाणार होते ? जर सत्य बाहेर आले तर”, फडणवीसांनी कोल्हेंना दिला इशारा
Published On
By Manisha Thorat- Pisal
देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला आहे. त्यामुळे आता आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असा विश्वास आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी पाच कंदील चौक, शिरूर येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले.. भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच : आढळराव पाटील
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरूर लोकसभेतुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतीच भोसरी गावच्या यात्रा उत्सवात कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. यावेळी भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा निमित्त आयोजित कुस्तीचे थरार अनुभवले. प्रचंड संख्येने उपस्थित कुस्ती शौकिनांनी आढळराव पाटील यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. 'माझ्या पंधरा वर्षांच्या कामाचा हिशोब मी जनतेला दिलाय'; आढळराव पाटील
Published On
By Manisha Thorat- Pisal
मी १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला आहे, जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे असे प्रतिपादन शिवाजी आढळराव पाटील यांनी मोशी येथे केले. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज मोशी, चिखली, जाधववाडी परिसरात आपला प्रचार दौरा केला. यावेळी जाधववाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.