तुझी फक्त 30% वाचण्याची शक्यता; डॉक्टरांचे शब्द ऐकून सोनाली बेंद्रेच्या पायाखालची जमिनच सरकली!

तुझी फक्त 30% वाचण्याची शक्यता; डॉक्टरांचे शब्द ऐकून सोनाली बेंद्रेच्या पायाखालची जमिनच सरकली!

अभिनेता शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं 2004 मध्ये फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला. 2014 मध्ये तिने ‘अजीब दास्तां है ये’ या मालिकेतून पुनरागमन केलं, मात्र ही मालिका काही महिन्यांतच बंद झाली होती. आता सोनाली ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली तिच्या आजारपणाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 2018 मध्ये सोनालीला कॅन्सरचं निदान झालं होतं.

“ते खरंच धक्कादायक होतं. मला कॅन्सर कसा होऊ शकतो, असा प्रश्न पडला होता. मी एका रिअॅलिटी शोमध्ये काम करत होते, तेव्हा मला कॅन्सरचं निदान झालं होतं. आम्ही दर आठवड्याला शूटिंग करत होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही सतत शोमध्ये दिसत आणि अचानक एकेदिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोरून लांब जाता, तेव्हा अर्थातच तुमच्याबद्दल चर्चा होऊ लागते. पण माझ्या तब्येतीत काहीतरी बरंवाईट जाणवत होतं. जेव्हा डॉक्टरकडे गेली आणि तपासण्या केल्या तेव्हा कॅन्सरचं निदान झालं. पहिल्यांदा मला हे फार छोटं असेल असं वाटलं होतं. पण जसजशा पुढे तपासण्या होत गेल्या, तसतसं आम्हाला समजलं की हा छोटा-मोठा आजार नाही. मला ते डॉक्टरांच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं. जेव्हा त्यांनी PET स्कॅन केला, तेव्हा माझ्या डॉक्टरांचा आणि पती गोल्डी बहलचा चेहराच पांढरा पडला होता”, असं सोनालीने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

याविषयी ती पुढे म्हणाली, “जेव्हा एखाद्या रुग्णाची PET स्कॅन केली जाते, तेव्हा कॅन्सरच्या पेशी दिसून येतात. त्यातून तुमच्या शरीरात कॅन्सर कुठे आणि किती पसरला आहे, ते समजतं. ज्यांनी माझा PET स्कॅन केला, त्यांनी सांगितलं की कॅन्सर माझ्या शरीरात इतका पसरला होता की स्कॅनिंग केल्यावर ते आम्ही ख्रिसमसच्या झाडासारखं दिसलं होतं. मला कॅन्सर झालाय, हे मी सुरुवातीला स्वीकारायलाच तयार नव्हते. मी घरी जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मी झोपेतून उठले, तेव्हा काहीच बदललं नव्हतं. माझ्या पतीने त्यावेळी काही जलद निर्णय घेतले आणि पुढच्या दोन दिवसांत आम्ही परदेशात उपचारासाठी गेलो. माझा मुलगा त्यावेळी माझ्यासोबत नव्हता, म्हणून मी पतीशी भांडत होते. मला थोडा वेळ द्यायला पाहिजे होतं, अशी माझी अपेक्षा होती. पण मी इतर कुठलाही विचार न करता फक्त आणि फक्त उपचारावर लक्ष केंद्रीत करावं, असं त्याचं म्हणणं होतं.”

सोनालीला चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या वाचण्याची केवळ 30 टक्के शक्यता असल्याचं सांगितलं होतं. “डॉक्टरच असं कसं म्हणू शकतात, असा सवाल मी त्यांना केला. मी त्यांना सतत हेच विचारत होती की हे कसं शक्य आहे? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसता, तेव्हा तुम्ही तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीवर तो राग काढता. त्यावेळी मी डॉक्टरांवर तो राग काढत होते. पण आता मागे वळून पाहिल्यावर मला समजतंय की ते फक्त सत्य सांगत होते आणि कोणतीच गोष्ट सत्याला बदलू शकत नाही.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका
देशातील ४९ जागांवर मतदान सोमवारी सुरु झाले. त्यात महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यातील मुंबईतील सहा...
अब तो अपना राज है, डरने की क्या बात…, अमिताभ बच्चन यांनी हटके स्टाईलमध्ये केलं मतदान करण्याचं आवाहन
Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video
भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, ‘उमेदवाराला मतदान करताना…’
मतदान सुरु होण्यापूर्वीच अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत, व्हिडिओ आला समोर
बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू
सांगली रेल्वेस्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ताब्यात, फलटणच्या तरुणाला मुंबईतून केली अटक