भाजपामध्ये प्रवेश केलेले शेखर सुमन तब्बल इतक्या संपत्तीचे मालक, आलिशान बंगला ते या गाड्या..

भाजपामध्ये प्रवेश केलेले शेखर सुमन तब्बल इतक्या संपत्तीचे मालक, आलिशान बंगला ते या गाड्या..

बाॅलिवूड अभिनेते शेखर सुमन हे कायमच चर्चेत असतात. शेखर सुमन गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसत आहेत. शेखर सुमनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियावर शेखर सुमन सक्रिय देखील दिसतात. विशेष म्हणजे शेखर सुमन हे कोट्यवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. आता नुकताच शेखर सुमन यांनी राजकारणात प्रवेश केलाय. शेखर सुमन यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केलाय. पंधरा वर्षानंतर परत त्यांनी राजकारणात प्रवेश केलाय. यापूर्वी 2009 मध्ये कांग्रेसच्या तिकिटावर  लोकसभा निवडणूक लढवली होती.

त्यावेळी शेखर सुमन यांनी पटना साहिबमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. शेखर सुमन यांनी भाजपा उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणूकीमध्ये शेखर सुमन यांचा पराभव झाला. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा हे विजयी ठरले होते. आता बीजेपीमध्येच शेखर सुमन यांनी प्रवेश केलाय.

शेखर सुमन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. विशेष म्हणजे शेखर सुमन हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. शेखर सुमन यांचे मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असे घर आहे. हेच नाही तर शेखर सुमन हे लग्झरी गाड्यांचे मोठे शाैकीन आहेत. त्यांच्याकडे अत्यंत महागड्या गाड्या देखील आहेत.

रिपोर्टनुसार शेखर सुमन यांच्याकडे तब्बल 20 कोटी संपत्ती आहे. मुंबईमध्ये एक अत्यंत आलिशान असा बंगला देखील त्यांच्याकडे आहे. मर्सिडीज बेंज आणि बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या देखील शेखर सुमन यांच्याकडे आहेत. विशेष म्हणजे शेखर सुमन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये टीव्ही मालिकांपासून बाॅलिवूड चित्रपटांपर्यंत काम केले आहे.

शेखर सुमन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तब्बल 30 बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता शेखर सुमन हे राजकारणात काय धमाका करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत होत्या की, शेखर सुमन हे राजकारणात प्रवेश करणार आहेत. शेवटी त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;