इन्स्टाग्रामवर Reels पोस्ट करत लाखोंची कमाई करायची मॉडेल, तेच ठरलं हत्येचं कारण! पण कसं?

इन्स्टाग्रामवर Reels पोस्ट करत लाखोंची कमाई करायची मॉडेल, तेच ठरलं हत्येचं कारण! पण कसं?

माजी मिस इक्वेडोर स्पर्धक आणि मॉडेल लँडी पर्रागा गोयबुरो हिच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. 2022 ची मिस इक्वाडोर स्पर्धक 23 वर्षीय लँडी पर्रागा गोयबुरो हिची गेल्या आठवड्यात क्वेवेडो शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तिच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. लँडी पर्रागा गोयबुरो हिच्या हत्येनंतर सोशल मीडियावर नको त्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम पोस्ट करणं आणि इन्स्टाग्राम लोकेशन ऑन केल्यामुळे गुन्हेगारांना कळलं की लँडी पर्रागा गोयबुरो कुठे आहे.

ज्या इन्स्टाग्रामवर फोटो, रिल्स पोस्ट करून लँडी पर्रागा गोयबुरो हिने लाखोंची कमाई केली. त्याच इन्स्टाग्राममुळे लँडी पर्रागा गोयबुरो हिची हत्या झाली… असे देखील नेटकरी सोशल मीडियावर बोलत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करणं आणि लोकेशन ऑन केली नसती तर, आज लँडी पर्रागा गोयबुरो जिवंत असती…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by LANDY PARRAGA (@landyparraga.ec)

 

लग्नात सामिल होण्यासाठी दुसऱ्या शहरात गेली होती लँडी पर्रागा गोयबुरो

मीडिया रिपोर्टनुसार, लँडी पर्रागा गोयबुरो एका लग्नात सामिल होण्यासाठी क्वेवेदो शहरात गोली होती. ज्याठिकाणी लँडी पर्रागा गोयबुरो हिची हत्या करण्यात आली. लँडी पर्रागा हिचं ड्रग स्मगलर लिआंद्रो नोरेरोसोबत अफेअर होतं. लिआंद्रो नोरेरो यांचा एक वर्षापूर्वी तुरुंगात झालेल्या दंगलीत मृत्यू झाला. तेव्हापासून लँडी पर्रागा अनेकांच्या हिटलिस्टमध्ये होती.

लँडी पर्रागा हिच्या हत्येसाठी दिलेली सुपारी?

लँडी पर्रागा हिच्या हत्येसाठी कोणाला सुपारी देण्यात आली होती का? याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भ्रष्टाचाराच्या तपासात लँडी पर्रागा हिचं देखील नाव समोर आलं होतं.

मृत्यूआधी लँडी पर्रागा हिने केलेली सोशल मीडिया पोस्ट

मृत्यूआधी लँडी पर्रागा हिने रेस्टॉरंटमध्ये जेवताना फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. याच दरम्यान, लँडी पर्रागा हिने लोकेशन सुरु केलं आणि सोशल मीडियावर स्वतःचा फोटो पोस्ट केला. ज्यानंतर आरोपींना घटनास्थळाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून लँडी पर्रागा हिची गोळ्या झाडून हत्या केली.

घडलेली धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दोन अज्ञात व्यक्ती बंदूक घेऊन रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीसोबत बोलत असलेल्या लँडी पर्रागा हिच्यावर निशाणा साधतात आणि तिच्यावर तीन गोळ्या झाडून लँडी पर्रागा हिची हत्या करतात. सध्या सर्वत्र धक्कादायक घटनेची चर्चा रंगली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;