रविवारी मेगा ब्लॉकमुळे होणार गणेशभक्तांचा खोळंबा
गणेशोत्सवात गणेश दर्शनासाठी मुंबई व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लालबाग, चिंचपोकळी येथे लोकलने येत असतात. रविवारी मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे त्यांचा खोळंबा होणार आहे.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहारदरम्यान रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे करीरोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.
गणेशभक्तांना लालबागला जायचे असेल तर करीरोड, चिंचपोकळी या स्थानकांवर उतरावे लागते. मेगा ब्लॉकमुळे तिथे गाडय़ा थांबणार नसल्याने त्यांना परळ किंवा भायखळा या स्थानकांवर उतरून लालबाग गाठावे लागणार आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी मेगा ब्लॉक असल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List