नौदलाच्या स्पीड बोटीची प्रवासी लाँचला धडक, मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील थरारक घटना; सुदैवाने 10 प्रवासी बालबाल बचावले

नौदलाच्या स्पीड बोटीची प्रवासी लाँचला धडक, मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील थरारक घटना; सुदैवाने 10 प्रवासी बालबाल बचावले

डिसेंबर महिन्यात नौदलाची स्पीड बोट व निलकमल लाँच यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 14 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या काळ्याकुट्ट आठवणी पुन्हा जाग्या व्हाव्यात अशीच दुसरी घटना उरण – भाऊचा धक्कादरम्यान शुक्रवारी रात्री घडली आहे. नौदलाच्या स्पीड बोटीने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी लाँचला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून १० प्रवासी बालबाल बचावले आहेत. मात्र डिसेंबरमधील दुर्घटनेच्या त्या आठवणींनी प्रवाशांचा थरकाप उडाला.

ज्ञानेश्वर ही लाँच 10 प्रवाशांना घेऊन भाऊचा धक्कासाठी सुटली होती. नौदलाच्या बीकनजेट्टी समोर आल्यानंतर जेएनपीए बंदराकडून वेगाने येणाऱ्या नौदलाची स्पीड बोट ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होती. वेगात असलेल्या नौदलाच्या स्पीड बोटचालकाला लाँचमधील सारंग, ड्रायव्हर, खलाशी, प्रवाशांनी आरडाओरडा करीत सावध करण्याचा व लक्ष वेधून घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र स्पीडबोटवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने नौदलाची स्पीड बोट अखेर संत ज्ञानेश्वर लाँचला धडकलीच. मात्र सुदैवाने संत ज्ञानेश्वर लाँचला नौदलाच्या स्पीड बोटींने दिलेली धडक मोठी नव्हती. या धडकेमुळे लाँचच्या पुढील लाकडी भागाचे अंशतः नुकसान झाले. यामुळे दहाही प्रवासी सुदैवी ठरले. परंतु धडक जोरदार बसली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

तपासणीनंतरच प्रवासी वाहतूक
अपघातानंतर खबरदारी म्हणून अपघातग्रस्त संत ज्ञानेश्वर लाँच प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. तपासणीनंतरच या लाँचला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली जाणार असल्याची माहिती भाऊचा धक्का येथील बंदर निरीक्षक सुशील साटेलकर यांनी दिली. याप्रकरणी प्रवाशांनी यलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला
मासेमारी करून परत मिरकरवाडा बंदरात येणारी ‘अमीन आएशा’ ही मच्छिमार नौका बुडाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या नौकेवर एकूण आठ...
अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत 200 कोटींचा घोटाळा, आमदार रोहित पवार यांचा आरोप
Ratnagiri News – तिहेरी हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, शिवसेनेची मागणी
इस्रायलमध्ये बस स्टॉपवर अंधाधुंद गोळीबार, 5 जण ठार; 15 जण जखमी
Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ?
तिसऱ्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण, खून करून उचलले धक्कादायक पाऊल
आधारकार्ड ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावाच लागेल! SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ECI ला महत्त्वाचे आदेश