टॉयलेटमध्ये 5 मिनिटं फोनचा वापर म्हणजे या खतरनाक आजाराला निमंत्रण; 46 टक्के वाढतो धोका
हे डिजिटल युग आहे. आता स्मार्टफोनचा वापर हा केवळ एकमेकांशी संपर्क साधन्यापुरता उरला नाही. आता हातात मनोरंजन आले आहे. जगाशी जोडण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मारा आहे. तुमचा मोबाईल हेच जग झाले आहे.
काही वर्षांपासून टॉयलेटमध्ये सुद्धा फोनचा वापर तेजीने वाढला आहे. परदेशातील हा ट्रेंड देशातही आला आहे. पण टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणे अत्यंत घातक आहे. त्याचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होतो.
टॉयलेट ही दुषित जागा आहे. या ठिकाणी किटाणू आणि संसर्गाचा धोका वाढतो. तरीही लोक टॉयलेटमध्ये फोन घेऊन जातात आणि तासन तास त्याचा वापर करतात. पण यामुळे एक आजारपण जडते.
अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, टॉयलेटमध्ये फोनचा वापर केल्याने मुळव्याध, भंगदर सारखे गंभीर आजार होतात. हा आजार बळवण्याचा धोका 46 पट्टीने वाढतो. 5-10 मिनिटांचा वापर सुद्धा धोकादायक ठरु शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List