विद्यार्थ्यांच्या पाठीवर महागाईच्या दप्तराचे ओझे!

विद्यार्थ्यांच्या पाठीवर महागाईच्या दप्तराचे ओझे!

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) स्लॅबमध्ये बदल करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याचा केंद्र सरकारचा दावा फोल ठरला आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गरजेची असलेली बॅग, बॉल पेन आणि छापील पुस्तकांवर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तर महागणार आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत याची माहिती दिली आहे. जीएसटी स्लॅबमधील बदलानंतर जवळपास 1200 प्रकारच्या वस्तूंसाठी नवीन दरपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना लागणारे बॉल पॉइंट पेन, फेल्ट टिप्ड आणि अन्य टिप्ड पेन, मार्कर, फाउंटन पेन, स्टायलो ग्राफ पेन या सर्वांवर 18 टक्के जीएसटी लागू राहणार आहे. छापील पुस्तकांसाठी लागणाऱया अनकोटेड पेपरला जीएसटीच्या 18 टक्के श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे ही पुस्तके महागणार आहेत. याची अंमलबजावणी 22 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे. त्यामुळे पालकांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे.

कोणत्या वस्तूंवर सूट?

पेन्सिल, क्रेयॉन, पेस्टल, ड्रॉइंग चॉक आणि खडू यांच्यावरील जीएसटी 12 टक्क्यांवरून शून्य करण्यात आला आहे. तर सराव पुस्तके, ग्राफ, प्रयोगशाळेच्या वह्या आणि वह्यांसाठी वापरल्या जाणाऱया कागदांवर सूट देण्यात आली आहे. परंतु, सूट दिलेल्या वस्तूंच्या यादीत छापील पुस्तकांचा उल्लेख करण्यात आला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच, महाविकास आघाडीवर परिणाम नाही ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच, महाविकास आघाडीवर परिणाम नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. महाविकास आघाडीवर...
असं झालं तर… घरात आग लागली तर…
फोनचे कव्हर खराब झाले असेल… हे करून पहा
सेबीची अदानी समूहाला क्लीन चिट, हिंडनबर्गचे आरोप फेटाळले
IND VS OMN हिंदुस्थान आणखी एका महाविजयासाठी सज्ज, आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना
‘भूमिका’ नाटकाचा  ‘माझा पुरस्कार’ने गौरव; अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘असेही एक नाटय़संमेलन’ रंगणार
मतचोरीचे 100 टक्के बुलेटप्रूफ पुरावे! राहुल गांधी यांचे क्षेपणास्त्र… पाऊण तासात आयोगाच्या चिंधडय़ा