Latur news – पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या CISF जवानासह तिघांचे मृतदेह सापडले; कुटुंबियांनी फोडला हंबरडा

Latur news – पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या CISF जवानासह तिघांचे मृतदेह सापडले; कुटुंबियांनी फोडला हंबरडा

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. जळकोट तालुक्यातील तिरुका येथील सुदर्शन माधव घोणशेट्टे (वय – 27) हा तरुण तिरू नदीत वाहून गेला, तर मौजे पाटोदा-माळहिप्परगा मार्गावरील नाल्यावरून जाताना ऑटो रिक्षा प्रवाहात वाहून गेली. या रिक्षासोबत वैभव पुंडलिक गायकवाड (वय – 24, रा. नरसिंहवाडी, ता. उदगीर) आणि सीआयएसएफ जवान शान मुरहरी सूर्यवंशी (वय – 32) हे देखील वाहून गेले होते. या गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तिघांचाही मृतदेह शोध पथकाला सापडला आहे. तिघांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले तेव्हा कुटुंबियांनी फोडलेल्या हंबरड्याने बचाव पथकाचेही डोळे पाणावले.

सुदर्शन घोणशेट्टे हा तरुण शेताकडे गेलेला असताना तिरू नदीत वाहून गेला होता. तर रात्री आठ वाजता एका पुलावरून रिक्षासह पाच जण वाहून गेले होते. यातील राकेश वाघमारे आणि रिक्षाचलक पोहून पुराच्या पाण्यातून बाहेर आले होते. तर विठ्ठल गवळे एका झाडाला पकडून बसल्याने बचाव पथकाने त्यांना वाचवले. तर सुदर्शन घोणशेट्टेसह रिक्षातील दोघे बेपत्ता होते. बचाव पथकामार्फत त्यांचा शोध सुरू होता.

गुरुवारी सकाळी वैभव गायकवाड यांचा मृतदेह तलावामध्ये सापडला, तर सुदर्शन घोणशेट्टे यांचा मृतदेह तिरुका येथील पांडुचुला जवळ नदी पात्रात सापडला. सायंकाळी सीआयएसएफ जवानानाही मृतदेह मिळून आला. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल व उदगीर, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, ग्राम पंचायत, स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने तीन दिवस बचाव व शोध मोहीम राबविण्यात आली. तिघांचे मृतदेह कुटुंबियांनी सोपवण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. याचा...
केसगळती रोखण्यासाठी मोहरीच्या तेलात या गोष्टी मिसळून बघा, केस होतील काहीच दिवसात घनदाट
आनंद दिघे यांच्यावर अनेक संकटे आली, तरीही ते पळून गेले नाहीत! संजय राऊत यांनी मिंध्यांना सुनावले
पत्रकार परिषद घेत भूमिका मांडण्याची हिंमत राहुल गांधींकडे आहे, ती पंतप्रधानांकडे नाही; संजय राऊत यांचा भीमटोला
Iphone 17 सीरिजला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद, Apple Store बाहेर मध्यरात्रीपासून रांग
वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेला हा सुका मेवा आहे खूप गरजेचा, वाचा
तुळशीच्या पानात दडलाय आरोग्याचा खजिना, वाचा