AI च्या आभासी जगात स्वप्नरंजन करण्यापेक्षा खऱ्या जीवनाचा आनंद अनुभवा; शंतनू नायडूचा मोलाचा सल्ला

AI च्या आभासी जगात स्वप्नरंजन करण्यापेक्षा खऱ्या जीवनाचा आनंद अनुभवा; शंतनू नायडूचा मोलाचा सल्ला

सध्या सोशल मीडियावर AI चा एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालतोय. इन्स्टाग्राम असो की फेसबुक, कोणत्याही सोशल मीडिया साईटवर एआयच्या माध्यमातून तयार केलेले फोटो व्हायरल होत आहेत. तुम्ही सांगाल त्या रंगाच्या साडीतील फोटोची तरुणींना भुरळ पडली आहे. आत्तापर्यंत हजारो तरूणींना Gemini AI वर फोटो तयार करून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र एआयच्या हा ट्रेंडकडे अनेकांनी दुर्लक्ष केलंय. एआयचा हा ट्रेंड धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. अशातच टाटा ग्रुपचे कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांनेही प्रतिक्रिया दिली आहे.

दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा मित्र शंतनू नायडू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. एआयच्या या नव्या ट्रेंडबाबत यांने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्याने ट्रेंडबाबत मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. सध्या तरूणी त्यांच्या सोशल मीडियावर एआय-जनरेटेड साडीतील फोटो शेअर करत आहेत. पण मला समजत नाही की त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या गोष्टीसाठी त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची आवश्यकता का भासतेय? असा प्रश्न शंतनूने त्याच्या पोस्टमधून विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sock Talks (@socktalks.tv)

शंतनू म्हणाला की, तुम्ही हिंदुस्थानात राहताय, अमेरिकेत नाही. हिंदुस्थान म्हणजे साड्यांच माहेरघर… आताच्या घडीला तुमच्या कपाटात किमान 15 साड्या तरी असतील. तरीही तुम्ही एआयला वेगवेगळ्या साड्यांमधील फोटो बनवायला सांगितले, जे आधीच तुमच्या कपाटात आहेत. म्हणजे तुम्ही किती आळशी झाला आहात. जे तुमच्याकडे आहे त्याचेच फोटो तुम्ही एआय कडून बनवून घेताय. काय गरज आहे याची… तुम्ही घरात असलेल्या साड्या परिधान करा आणि फोटो काढा. त्यात तुम्ही फार सुंदर दिसता आणि आईच्या साडीत तर खुपच सुंदर दिसता. त्यामुळे एवढे कष्ट घेण्यापेक्षा साडी नेसा आणि सुंदर फोटो काढा…, असा सल्ला शंतनूने दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय? Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?
विषारी सापाचा दंश ही एक गंभीर बाब आहे. ही आपत्कालीन स्थिती मानल्या जाते. जर या काळात केवळ घाबरला तर हाती...
निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले! राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा
जयगडचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली
राजापूर रानतळे येथे मोकाट गुरांमुळे भीषण अपघात; वाहनचालक थोडक्यात बचावला
भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही! अटल सेतूच्या दूरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा संताप
Asia cup 2025 – सामना सुरू असताना श्रीलंकेच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन; कोच, टीम मॅनेजरनं सावरलं
महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल