आयफोन खरेदीसाठी जगभरात ग्राहकांच्या उड्या, 17 सीरिजचा आज पहिला सेल
अॅपलने 9 सप्टेंबरला आयफोन 17 सीरिज लाँच केली. या सीरिजमधील फोनचा पहिला सेल उद्या, 19 सप्टेंबर रोजी आहे. आयफोन चाहत्यांना या फोनची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. आयफोन खरेदी करण्यासाठी जगभरात ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. या सीरिजअंतर्गत कंपनीने आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 मॅक्स आणि आयफोन 17 एअर हे चार फोन लाँच केले. कंपनीने 12 सप्टेंबरपासून फोनला प्री ऑर्डरसाठी उपलब्ध केले होते. हिंदुस्थानसह जगभरात आयफोनचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आयफोन 17 सीरिजच्या प्री ऑर्डरला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हजारो ग्राहकांनी आयफोन बुक केले आहेत.
आयफोन 17 प्रो मॅक्स आऊट ऑफ स्टॉक
चार आयफोनमध्ये आयफोन 17 प्रो मॅक्सच्या कॉस्मिक ऑरेंज कलर फोनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या कलरचा फोन खरेदीसाठी एकच झुंबड उडाली असून फोनची बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत हा फोन हिंदुस्थान आणि अमेरिकेत आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. यामुळे कंपनीने या फोनचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता 60 टक्के या फोनचे प्रोडक्शन वाढवणार आहे. आयफोन 17 प्रो मॅक्स फोनची सुरुवातीची किंमत 1 लाख 49 हजार 900 रुपये आहे, तर या फोनच्या 2 टीबी व्हेरियंटसाठी 2 लाख 29 हजार 900 रुपये मोजावे लागतील.
आयफोन 17 फीचर्स
6.3 इंचांचा ओलेड डिस्प्ले, 120 एचझेड रिफ्रेश रेट, आयओएस 26, ए19 प्रो प्रोसेसर, 2622×1206 रिझॉल्यूशन, 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल रियर कॅमेरा प्लस 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 18 मेगापिक्सलचा सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा.
आयफोन एअरची फीचर्स
6.3 इंचांचा ओलेड डिस्प्ले, 120 एचझेड रिफ्रेश रेट, आयओएस 26, ए19 प्रो प्रोसेसर, 2736×1260 रिझॉल्यूशन, 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल रियर कॅमेरा प्लस 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 18 मेगापिक्सलचा सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा.
आयफोन 17 प्रो फीचर्स
6.3 इंचांचा ओलेड डिस्प्ले, 120 एचझेड रिफ्रेश रेट, आयओएस 26, ए19 प्रो प्रोसेसर, 2622×1206 रिझॉल्यूशन, 48 प्लस 48 प्लस 48 प्लस मेगापिक्सलचा कॅमेरा (8xझूम), 18 मेगापिक्सलचा सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा.
आयफोन 17 प्रो मॅक्स फीचर्स
6.9 इंचांचा डिस्प्ले, 120 एचझेड रिफ्रेश रेट, आयओएस 26, ए19 प्रो प्रोसेसर, 2868×1320 रिझॉल्यूशन, 48 प्लस 48 प्लस 48 प्लस मेगापिक्सलचा कॅमेरा (8xझूम), 18 मेगापिक्सलचा सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List