‘भूमिका’ नाटकाचा  ‘माझा पुरस्कार’ने गौरव; अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘असेही एक नाटय़संमेलन’ रंगणार

‘भूमिका’ नाटकाचा  ‘माझा पुरस्कार’ने गौरव; अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘असेही एक नाटय़संमेलन’ रंगणार

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘असेही एक नाटय़संमेलन’  रंगणार आहे. यावेळी ‘भूमिका’ या नाटकाला ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. या नाटकाला तब्बल सात पुरस्कार दिले जातील. हा सोहळा 24 सप्टेंबर रोजी दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिर येथे सायंकाळी 7.30 वाजता होईल.

अशोक मुळ्ये  दरवर्षी आगळेवेगळे संमेलन भरवत असतात. आतापर्यंत त्यांनी नाटककारांचे संमेलन,  गतिमंद- अपंगांच्या मातांचे संमेलन, पत्रकारांचे संमेलन,  कॅन्सरमुक्तांचे संमेलन, घटस्फोटापासून परावृत्त झालेल्यांचे संमेलन अशी अनोखे संमेलने भरवली आहेत. यंदाही त्यांचे ‘असेही एक नाटय़संमलेन’ हटके आहे. नाटय़संमेलनाचे अध्यक्ष शरद पोंक्षे आहेत तर स्वागताध्यक्ष विजय केंकरे आहेत. यावेळी रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘भूमिका’ या  नाटकाला सात ‘माझा पुरस्कार’ दिले जाणार आहेत. यानिमित्त विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘माझा पुरस्कार’ चे यंदाचे 20 वे वर्ष आहे. या सोहळ्याच्या विनामूल्य सन्मानिका 22 सप्टेंबरपासून सकाळी 8.30 ते 11 आणि सायंकाळी  5 ते 8 यावेळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिरात उपलब्ध होतील, असे अशोक मुळ्ये यांनी कळवले आहे.

भूमिका नाटकाला सात पुरस्कार

n सर्वोत्कृष्ट नाटक          ः भूमिका

n सर्वोत्कृष्ट नाटककार    ः क्षितिज पटवर्धन

n सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक     ः चंद्रकांत कुलकर्णी

n सर्वोत्कृष्ट अभिनेता     ः सचिन खेडेकर

n सर्वोत्कृष्ट अभिनेत्री      ः समिधा गुरू

n सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता    ः सुयश झुंजूरके

n सर्वोत्कृष्ट नेपथ्य         ः प्रदीप मुळ्ये

गाणी तुमच्या आवडीची

‘असेही एक नाटय़संमेलन’ आणि ‘माझा पुरस्कार’ सोहळ्यादरम्यान ‘गाणी तुमच्या आवडीची’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. याचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे आहे. गायक केतकी भावे जोशी, शिल्पा मालंडकर, श्रीरंग भावे, जयंत पिंगुळकर नीलिमा गोखले  गाणी सादर करतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;