ट्रम्प यांचा पुन्हा झटका! हिंदुस्थानला ड्रग्स तस्कर देशांच्या यादीत टाकले, संशयावरून काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द

ट्रम्प यांचा पुन्हा झटका! हिंदुस्थानला ड्रग्स तस्कर देशांच्या यादीत टाकले, संशयावरून काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादत मोठा झटका दिला. यामुळे हिंदुस्थानला मोठा आर्थिक फटका बसत आहे. आता ट्रम्प यांनी हिंदुस्थानला आणखी एक झटका दिला आहे. अमेरिकेने हिंदुस्थानला ड्रग्स तस्कर देशांच्या यादीत टाकले. तसेच हिंदुस्थानमधील काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा व्हिसाही रद्द केला आहे. फेंटेनाइल ड्रग्सशी संबंधित रसायनांच्या तस्करीत सामील असल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचे अमेरिकेच्या दुतावासाने म्हटले आहे.

ड्रग्स तस्कर 23 देशांच्या यादीत हिंदुस्थानची समावेश

ट्रम्प यांनी ड्रग्स तस्करी आणि बेकायदेशीर ड्रग्स उत्पादनात सामील असलेल्या देशांच्या यादीत 23 देशांचा समावेश केला आहे. या देशांमध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, कोलंबिया, बोलिव्हिया आणि व्हेनेझुएला यांचा समावेश अमेरिकेने केला आहे. ट्रम्प यांनी 15 सप्टेंबर रोजी अमेरिकन काँग्रेसला ‘प्रेसिडेन्शियल डिटरमिनेशन रिपोर्ट’ सादर केला. या देशांमध्ये बेकायदेशीर ड्रग्स उत्पादन आणि तस्करी अमेरिका आणि तिच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करते, असे या रिपोर्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफचा हिंदुस्थानला फटका, निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट

ड्रग्स तस्करी, विशेषतः फेंटेनाइल सारख्या घातक ड्रग्समुळे अमेरिकेत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य संकटात आले आहे. आणि 18 ते 44 वयोगटातील अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरले आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

दुबईत नव्हे, तर अमेरिकेत मिळतंय स्वस्तात सोने; ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, स्वित्झलँडमध्येही कमी दर

कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर ड्रग्स तस्करीचा आरोप

व्हिसा रद्द केल्याने हिंदुस्थानच्या कंपन्यांमधील संबंधित अधिकारी आणि त्यांचे कुटुंब अमेरिकेत प्रवास करण्यास अपात्र ठरू शकतात. याव्यतिरिक्त, ज्या कंपन्यांवर फेंटेनाइल ड्रग्स तस्करीचा आरोप आहे अशा कंपन्यांशी संबंधित अधिकाऱ्यांची व्हिसा तपासणी आणखी कडक केली जाईल, असे अमेरिकेच्या दुतावासाने म्हटले आहे. बेकायदेशीर ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे अमेरिकेच्या दुतावासाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए, महाराष्ट्र सरकारला नोटीस; आरोपींच्या सुटकेला हायकोर्टात आव्हान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए, महाराष्ट्र सरकारला नोटीस; आरोपींच्या सुटकेला हायकोर्टात आव्हान
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली. बॉम्बस्फोटात बळी...
भालाफेकीत हिंदुस्थानच्या पदरी निराशा, निरजला आठव्या तर सचिनला चौथ्या क्रमांकावर मानावे लागले समाधान
ट्रम्प यांचा पुन्हा झटका! हिंदुस्थानला ड्रग्स तस्कर देशांच्या यादीत टाकले, संशयावरून काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द
हैदराबाद गॅझेट जीआरविरोधात अभ्यासपूर्ण रिट याचिका दाखल; यश नक्कीच मिळणार- मंत्री छगन भुजबळ
Latur News – लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख 87 हजार 151 हेक्टर शेतीचे नुकसान
Bad Food Combination: पतंजलीने सांगितले असे फूड कॉम्बीनेशन जे आरोग्यास हानिकारक, कोणते हे पदार्थ ?
ओबीसी आरक्षण गेले, आता नातवाला नोकरी लागणार नाही; आजोबांनी जीवन संपवले