Power Yoga : बाबा रामदेव यांनी सांगितला 5 मिनिटांचा पॉवर योगा, यातून मिळतात भरपूर फायदे
बाबा रामदेव योगासाठी प्रसिद्ध आहेत. योग गुरु बाबा रामदेव हे अनेक वर्षांपासून योगाचे प्रशिक्षण देत आहेत. रामदेव यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाला नवीन ओळख मिळवून दिलेली आहे. तसेच पतंजलीद्वारे आयुर्वेदातील जुन्या पद्धती घरा-घरात पोहचवण्यात रामदेव यांचे मोठे योगदान आहे. रामदेव यांनी त्यांचे पुस्तक, कार्यक्रम आणि सोशल मीडियाद्वारे योगा संदर्भात लोकांना योगाबद्दल जागरुक करत आहेत. योग शरीरासाठी किती चांगला आहे हे सर्वांना माहिती आहे. नियमित रुपाने योग केल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारापासून दूर राहू शकता.
योगात अनेक आसने असून वेगवेगळ्या शारीरिक समस्यांना दूर करण्यात ही आसने मदत करतात. परंतू लोकांना कामकाजामुळे वेळ काढता येत नाही. त्यामुळे ते आसने करु शकत नाहीत. त्यामुळळे बाबारामदेव यांनी यावर एक उपाय दिला आहे. त्यांनी 5 मिनिटांचा पॉवर योगा सांगितला आहे. चला तर जाणून घेऊयात पॉवरवाला योगा काय आहे आणि त्याचे फायदे काय ?
बाबा रामदेव यांना सांगितला 5 मिनटांचा पॉवर योगा
बाबारामदेव एका व्हिडीओत ५ मिनिटांच्या पॉवर योगा संदर्भात सांगत आहे. त्यांनी त्यांनी काही सोपी आसने सांगितली ज्याने संपूर्ण शरीर एनर्जेटिक होईल आणि तुमची ओव्हरऑल हेल्थवर चांगला परिणाम होईल. या ५ मिनिटांच्या पॉवर योगात गदा फिरवणे, हनुमान दंड, सूर्य नमस्कार, चक्रासन, वृजासन यांचा समावेश आहे. चला तर याचे फायदे पाहूयात…
पोस्चर सुधारणारे चक्रासन
चक्रासनाने शरीराला अनेक फायदे मिळतात, त्याने माकड हाड मजबूत होते. आणि शरीराचा आकार देखील प्रमाणबद्ध होतो.याशिवाय याने पचन यंत्रणा सुधारते.हार्ट हेल्थ चांगली होते. हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. जण तुम्हाला जादा तणावाचा सामना करावा लागत असेल तर चक्रासन याचा फायदा होतो.

vajrasana
वज्रासन पाठदुखीवर आराम देते
वज्रासनाचे अनेक शारीरिक लाभ आहेत, त्यामुळे पचन यंत्रणा चांगली होते. तसेच पाठीचे दुखणे देखील बऱ्याच प्रमाणात कमी होते. आणि तणाव कमी होतो. ५ मिनिटे वज्रासन केल्याने शरीराचे माकड सरळ होते. आणि एकाग्रता देखील वाढते.

surya namaskar
सूर्य नमस्कारपासून मोठे फायदे
५ मिनिटांच्या पॉवर योगात सुर्यनमस्काराचा देखील समावेश आहे. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. सकाळी ५ मिनिटे सुर्य नमस्कार केल्याने तुम्हाला दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळते. मसल्स स्ट्राँग बनतात. शरीराची लवचिकता वाढते. हार्ट हेल्थ पासून ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्यापर्यंतसाठी सुर्यनमस्कार लाभदायक आहेत.
येथे पोस्ट पाहा –
गदा फिरवणे आणि हनुमान दंड
गदा फिरवणे आणि हनुमान दंड करणे देखील तुमच्या एकूण आरोग्यासाठी चांगले आहे. तुम्हा केवळ पाच मिनिटं गदा फिरवायची आणि ज्यामुळे मसल्स स्ट्राँग बनतात आणि एनर्जी वाढते. हनुमान दंडामुळे चेस्ट सुडौल बनते. पाय आणि जांघा मजबूत होतात. पाठदुखीपासून आराम मिळतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List