हैदराबाद गॅझेट जीआरविरोधात अभ्यासपूर्ण रिट याचिका दाखल; यश नक्कीच मिळणार- मंत्री छगन भुजबळ
हैदराबाद गॅझेट जीआरविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु ती जनहित याचिका होती,कोर्टाने रिट याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आपण अभ्यासपूर्वक रिट याचिका दाखल केलेल्या असून तिथे आपल्याला नक्की यश मिळणार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नवे असे आवाहन त्यांनी केले. हा काढलेला जीआर रद्द करा किवा आवश्यक त्या सुधारणा करा अशी आपली मागणी आहे. यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे. मराठा समजाच्या खोट्या नोंदी करून दाखले मिळविले जात आहे. याबाबत तात्काळ कारवाई करून खोट्या नोंदी तपासण्यासाठी समिती तयार करा असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथील रेशीम बाग चौकातील महात्मा फुले सभागृहात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यशासनाच्या वतीने मराठा समाजासाठी जीआर काढण्यात आला. या जीआर मुळे काय नुकसान होणार आहे हे पुढे यायला लागले त्यानंतर राज्यातील 7 ते 8 ओबीसी बांधवांनी आत्महत्या केली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे त्यांनी सांगून सुद्धा ओबीसी आरक्षणासाठी आयोग नेमण्यात आला नव्हता. ओबीसी आरक्षणाचा लढा आजचा नाहीये,स्वातंत्र्यापासून ही लढाई सुरू आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीच्या वेळेपासूनच सुरू केलेली आहे.आरक्षणाचा पाया आर्थिक नाही, तर सामाजिक विषयावर आहे. 5 हजार वर्षांपासून जे जे समाज पिचलेले, दबलेले आहेत. त्यांना आरक्षण आहे. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. शोषित पिडीत समजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यक्रम आहे . गरिबी हटाव साठी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार कडून योजना राबविल्या जात आहे. ओबीसीमध्ये एक जात नाही यामध्ये 375 हून अधिक जातींचा समावेश आहे.तुमची लेकरंबाळं आहेत तशी या गोरगरीब जनतेची सुद्धा लेकरंबाळं आहेत. त्यांची काय कुत्री मांजरी आहेत का? ही गरिबी सगळीकडेच आहे. परंतु ही गरिबी हटविण्यासाठी शासन वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहेत. मराठा समाजाच्या लेकराबळावरती आमचं प्रेम आहे. दोन पैसे त्यांना मिळाले पाहिजे अस आमचं म्हणन आहे. परंतु त्यासाठी वेगळा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला वेगळ आरक्षण मिळाले तर त्यांचा फायदा आहे. ओबीसीत येऊन फायदा मिळणार नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या काही निकालांमध्ये ओबीसीचे मेरीट सर्वांच्या पेक्षा जास्त आहे. तर ईडब्ल्यूएस व ओपन त्यापेक्षा कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List