गगनभरारीसाठी सरसावली ‘लीला’; वयाच्या 71 व्या वर्षी आकाशाला गवसणी

गगनभरारीसाठी सरसावली ‘लीला’; वयाच्या 71 व्या वर्षी आकाशाला गवसणी

आयुष्यात कोणतीही गोष्ट करायला वयाच बंधन नसतं. जर जिद्द आणि चिकाटी असेल तर अवघड गोष्टही आपण सहज साध्य करू शकतो. यायचं एक उत्तम उदाहरण म्हणजे केरळच्या लीला जोस. त्यांनी वयाचं बंधन झुगारुन 71 व्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील कोन्नाथडी येथील रहिवाशी लीला जोस 13 हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करणाऱ्या राज्यातील सर्वात वृद्ध महिला ठरल्या आहेत.

लीला यांनी स्कायडायव्हिंगचे स्वप्न पाहिले होते. आकाशात उडणारी विमाने पाहून त्यांना अनेकदा आकाशात झेपावण्याची इच्छा होत होती. एकदा उडणारे विमान पाहून त्यांनी मित्रांना सहज म्हटले होते, स्कायडायव्हिंग करायला किती मजा येईल! त्यावेळी सगळ्यांनी त्यांची थट्टा केली. मात्र, लीला यांनी त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. हा थरारक अनुभव घेण्याची त्यांची इच्छाशक्ती दांडगी होती. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या मुलाला भेटण्यासाठी लीला गेल्या महिन्यात दुबईला गेल्या होत्या. त्यांनी मुलाकडे स्कायडायव्हिंग करण्याची इच्छा व्यक्त केली.

आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मुलाने (अनिश) दुबईच्या स्कायडायव्हिंग टीमसोबत टँडम जंप बुक केला आणि अनिश आपल्या 71 वर्षाच्या आईला घेऊन तेथे पोहोचला. स्कायडायव्हिंग करण्यासाठी आलेल्या लीला यांना पाहून तेथील प्रशिक्षक आश्चर्यचकीत झाले. अनिशने उड्डाण, मार्गदर्शक आणि व्हिडिओग्राफी यासाठी जवळजवळ 2लाख रुपये खर्च केले. लीला यांनी अनुभवलेला तो क्षण सुवर्णक्षणांपैकी एक होता. “एका क्षणी, मला फार हलके वाटले, त्या वेळी मी सगळे विचार विसरून त्या क्षणाचा आनंद घेतला, असे लीला यांनी सांगितले.

इडुक्कीमध्ये घरी परतल्यावर, लीलाने तिच्या मैत्रिणींसोबत तिच्या साहसाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. लीला यांनी 71 व्या वर्षी तिचे स्वप्न पूर्ण केले. आता अंतराळात झेपणावण्याचे त्यांचे स्वप्न आहे. जर वयाची मर्यादा नसेल तर मी इस्रोला माझ्या इच्छेचा विचार करण्यास सांगू इच्छिते, असेही लीला यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. याचा...
केसगळती रोखण्यासाठी मोहरीच्या तेलात या गोष्टी मिसळून बघा, केस होतील काहीच दिवसात घनदाट
आनंद दिघे यांच्यावर अनेक संकटे आली, तरीही ते पळून गेले नाहीत! संजय राऊत यांनी मिंध्यांना सुनावले
पत्रकार परिषद घेत भूमिका मांडण्याची हिंमत राहुल गांधींकडे आहे, ती पंतप्रधानांकडे नाही; संजय राऊत यांचा भीमटोला
Iphone 17 सीरिजला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद, Apple Store बाहेर मध्यरात्रीपासून रांग
वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेला हा सुका मेवा आहे खूप गरजेचा, वाचा
तुळशीच्या पानात दडलाय आरोग्याचा खजिना, वाचा