असं झालं तर… घरात आग लागली तर…
घरात आग लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आग लागल्याची कारणेही वेगवेगळी असू शकतात, परंतु जर तुमच्या घरात छोटी किंवा मोठी आग लागली तर काय कराल.
सर्वात आधी शांत राहा. गोंधळून आणि घाबरून जाऊ नका. घाबरल्यामुळे योग्य निर्णय घेणे अवघड होते. शांत राहण्याचा प्रयत्न करा. आग लागल्याचे घरातील सर्वांना ओरडून सांगा.
कोणताही विलंब न लावता घरातून तत्काळ बाहेर पडा. इमारतीला लिफ्ट असेल तर त्याचा वापर न करता लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. पायऱ्यांवरून काळजीपूर्वक चला.
घरात आणि घराबाहेर धूर जास्त असल्यास जमिनीलगत वाकून चला. धूर वरच्या दिशेने जातो आणि खालच्या पातळीवर हवा शुद्ध असते.
घराबाहेर पडल्यानंतर आपत्कालीन नंबर 101 डायल करून अग्निशमन दलाला आगीची माहिती द्या. आगीमुळे विषारी धूर निघतो. त्यामुळे आग लागलेल्या ठिकाणापासून दूर राहा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List