वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेला हा सुका मेवा आहे खूप गरजेचा, वाचा

वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेला हा सुका मेवा आहे खूप गरजेचा, वाचा

शाळेपासून आपल्याला सांगण्यात आलंय की, बदाम आपल्या बु्द्धीसाठी खूप फायदेशीर आहे , पण त्याशिवाय बदामाचे आणखी सुद्धा फायदे आहेत. बदाम हे शरीरासाठी प्रचंड फायदेशीर असतं. यामध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. रोज बदाम खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॅाल कमी होण्यास मदत होते. आपल्या ह्रदयाचं स्वास्थ उत्तम राहतं. बदामामुळे हाडे तंदुरुस्त बनतात आणि बुद्धी तल्लख होते. बदामात फायबर हा घटक असल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

बदाम केवळ आपली बुद्धी तल्लख करत नाही तर, आपल्या शरीरामध्ये उर्जेसाठी सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. त्यासोबत वजन कमी करण्यापासून ते त्वचा चमकवण्यापर्यंत बदामाचे अनेक विविधांगी फायदे आहेत.

पोटात गॅस झाल्यावर फक्त एक चिमूटभर हा मसाल्यातील पदार्थ आहे गरजेचा, वाचा

आता आपण पाण्यात भिजवलेले बदाम खाण्याचे काय फायदे होतील हे बघुया.

बदाम पचायला खूप सोपे असतात कारण त्यात फायबर असते. यामुळे आपल्या पचनशक्तीसाठी बदाम हा खूप उत्तम मानला जातो. भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्यातील एंजाइम अन्न पचवण्यास मदत करतात. अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतात.

वजन कमी करायचे असल्यास, आहारात भिजवलेल्या बदामाचा समावेश करायलाच हवा. बदामात फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने, पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण अधिक खाणे टाळतो. बदामातील पोषक तत्वे आपल्या चयापचयाला चालना देतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.

दररोज एक पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत खास फायदे, जाणून घ्या

दिवसभर आळस किंवा थकवा जाणवत असल्यास, दररोज नाश्त्यात भिजवलेले बदाम खाणे गरजेचे आहे. बदामात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

बदामात विटामिन ई ,मॅग्नेशिअम, हेल्दी फॅट्स असतात. हे घटक मेंदुच्या कार्यासाठी लाभकारक मानले जातात. रोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने विस्मरणाची समस्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच लहान मुलांसाठी सुद्धा बदाम हे खूपच फायदेशीर मानले जातात.

बदामात विटामिन ई , ओमेगा -३ फॅटी अॅसिड आणि अॅंटिऑक्सिडंट अधिक प्रमाणात असतात. यामुळे त्वचेला पोषण मिळते, तसेच त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होते. विटामीन ई त्वचेचा कोरडेपणा कमी करतं. बदामाच्या सेवनामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि प्रदुषणापासून होणाऱ्या त्वचेच्या समस्येपासून रक्षण करतं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
भाजपचे वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत...
…अन्यथा पैसे बंद होणार! ऐन सणासुदीत लाडक्या बहि‍णींच्या डोक्याला ताप, महायुती सरकारनं दिलं नवं टास्क
पिवळ्या दातांवर ‘हा’ आहे जालीम उपाय, वाचा
केसांमधील उवा होतील चुटकीसरशी गायब, वापरा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
AI च्या आभासी जगात स्वप्नरंजन करण्यापेक्षा खऱ्या जीवनाचा आनंद अनुभवा; शंतनू नायडूचा मोलाचा सल्ला
मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल; पोलिसांकडून झाडाझडती, तपास यंत्रणा अलर्ट
बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध