Latur News – लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख 87 हजार 151 हेक्टर शेतीचे नुकसान
लातूर जिल्ह्याला यावर्षी पावसाने चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यातील 60 महसूल मंडळांपैकी 59 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 2 लाख 87 हजार 151 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तब्बल 244 कोटी रुपयांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. 236 कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्यातील शासन यांची भरपाई कशी करणार? हा खरा प्रश्न आहे. अगोदरच शासनाने सर्व कामे थांबलेली आहेत. राज्यभरात सर्वञ अशीच नुकसानीची परिस्थिती आहे. असे असताना शासन लोकांना देवाच्या आणि धर्माच्या नावावर सोडून देईल, अशी लोकांमध्ये चर्चा आहे.
लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यापूर्वी अवकाळीने तांडव मांडले होते. नियमित पावसाळा सुरू झाल्यानंतर अल्प वेळेत अधिक पाऊस झाला. त्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली. लातूर जिल्ह्यात 60 महसूल मंडळ आहेत. त्यापैकी 59 महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली आहे. जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र 6.02 लाख हेक्टर एवढे आहे. 2 लाख 87 हजार 151 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे नुकसान 244 कोटी रुपयांचे झाले आहे. मागील तीन दिवसात चार जणांचा मृत्यू झाला आहे. 209 जनावरांचे मृत्यू झाले आहेत. 1089 घरांची पडझड झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या इतिहासात पावसामुळे सर्वञ रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे चित्र या पावसाळ्यात पाहायला मिळाले. गाव पातळीवरील, जिल्हा पातळीवरील, राज्य पातळीवरील राष्ट्रीय पातळीवर रस्ता वाहतूक बंद पडली होती. पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे झालेले नुकसान तब्बल 52 कोटींचे आहे. जिल्ह्यातील प्रमुख पुलांचे झालेले नुकसान 88 कोटी रुपयांचे आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे नुकसान 26 कोटी रुपयांचे आहे. तर ग्रामीण भागातील पुलांचे नुकसान 30 कोटी रुपयांचे आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाचे नुकसान 17 कोटी रुपयांचे आहे. विद्युत व्यवस्थेचे नुकसान 1.5 कोटी रुपयांचे झाले आहे. एकंदरीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तब्बल 236 कोटी रुपयांचे आहे.
जिल्ह्यातील विकास थांबू नये यासाठी शासनाने किमान सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी 236 कोटी निधी मिळाला पाहिजे. शेती पिकांचे नुकसान 244 कोटींचे झाले आहे. पिकांचे नुकसान पाहता पिक विमा किती कमी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकरी शासन काही निर्णय घेऊन मदत करणार का? याकडे लक्ष ठेऊन आहेत. नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत. किमान हेक्टरी 50 हजार रुपये मदत शासन देईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List