Iphone 17 सीरिजला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद, Apple Store बाहेर मध्यरात्रीपासून रांग

Iphone 17 सीरिजला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद, Apple Store बाहेर मध्यरात्रीपासून रांग

अ‍ॅपलने ( 9 सप्टेंबर) ला आयफोन 17 सीरिज लाँच केली. त्यानंतर बाजारामध्ये हा फोन कधी येणार याची उत्सुकता अॅपलप्रेमींना लागली होती. (19 सप्टेंबर) IPhone17 चा सेल सुरु झाला. ही सिरीज लॉन्च झाल्यापासूनच चाहत्यांना या फोनची प्रचंड उत्सुकता लागलेली होती. त्यामुळे ग्राहकांनी रात्रीपासून मुंबईतील Apple Store बाहेर तोबा गर्दी करण्यास सुरुवात केली. हजारोंच्या संख्येने तरुणाई हा फोन विकत घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहिल्याचे चित्र  पाहायला मिळत आहे.

आयफोन 17 सीरिजच्या प्री ऑर्डरला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एएनआयने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील बीकेसी येथे असलेल्या अॅपल स्टोर बाहेर अॅपलाचा चाहता वर्ग पाहायला मिळत आहे. अनेकांनी या मोबाईलचे प्रीबुकिंग करून ठेवले होते. यामध्ये सर्वाधिक बुकिंग झालेला मोबाईल म्हणजे आयफोन 17 प्रो मॅक्स, जो कॉस्मिक ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

आयफोनसाठी कायपण…Apple 17 घेण्यासाठी ग्राहकांची उडाली झुंबड; मारामारी, ठोसे अन् झटापट Apple Store बाहेर तासंतास रांग लावून उभे असलेल्या प्रत्येकालाच हा फोन खरेदी करायचाय. त्यामुळे लोकांनी अक्षरश: एकमेकांना धक्काबुकी करायला सुरूवात केली आहे. इतकच काय तर ग्राहकांमध्ये स्टोअरच्या बाहेर हाणामारीही झाली. तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांना आणि स्टोअर सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशातच अमन चौहान नावाच्या एका तरूणाने देखील आयफोन 17 सीरिजमधील हेच 2 मोबाईलफोन विकत घेतले आहेत. दोन्ही फोन कॉस्मिक ऑरेंज कलरमध्ये असून त्यापैकी एक iPhone 17PRO Max (256GB) तर दुसरा (1TB) असल्याचे अमन चौहान याने सांगितले आहे. IPhone 17 साठी अमन गुरूवारी रात्री 12 वाजल्यापासून रांगेत उभा होता. या मोबाईलमध्ये 6.9 इंचांचा डिस्प्ले, 120 एचझेड रिफ्रेश रेट, आयओएस 26, ए19 प्रो प्रोसेसर, 48 प्लस 48 प्लस 48 प्लस मेगापिक्सलचा कॅमेरा (8xझूम), 18 मेगापिक्सलचा सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा असल्यामुळे या फोनला जास्त डिमांड मिळत आहे, असे त्यांने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
भाजपचे वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत...
…अन्यथा पैसे बंद होणार! ऐन सणासुदीत लाडक्या बहि‍णींच्या डोक्याला ताप, महायुती सरकारनं दिलं नवं टास्क
पिवळ्या दातांवर ‘हा’ आहे जालीम उपाय, वाचा
केसांमधील उवा होतील चुटकीसरशी गायब, वापरा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
AI च्या आभासी जगात स्वप्नरंजन करण्यापेक्षा खऱ्या जीवनाचा आनंद अनुभवा; शंतनू नायडूचा मोलाचा सल्ला
मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल; पोलिसांकडून झाडाझडती, तपास यंत्रणा अलर्ट
बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध