रशियाने कॅन्सरच्या या प्रकारावर लस शोधली, सर्व चाचण्या यशस्वीपणे केल्या पूर्ण
रशियाने कॅन्सरच्या लढाईत एक नवीन यश मिळवले आहे. रशियातील फेडरल मेडिकल तसेच बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) FMBA ने कॅन्सर या दुर्धर आजारावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. FMBD प्रमुख वेरोनिका स्क्वोर्त्सोवा यांनी सांगितले की रशियन एंटरोमिक्स कॅन्सर व्हॅक्सीन आता वापरासाठी तयार आहे. mRNA-बेस्ड या व्हॅक्सीनमध्ये सर्व प्रकारच्या प्री-क्लीनिकल टेस्टना यशस्वीपणे पार केले आहे. त्यामुळे ही लस सुरक्षित आणि प्रभावशील सिद्ध झाल्याचे म्हटले जात आहे. या लसीचे प्रारंभीक लक्ष्य कोलोरेक्टल कॅन्सर ( कोलन कॅन्सर ) असणार आहे.
व्हॅक्सीनने सर्व चाचण्या पार केल्या
रशियाच्या वृत्त संस्था TASS च्या बातमीनुसार रशियाच्या कॅन्सर प्रतिबंधक लसीने चाचण्यात चांगली कामगिरी केली आहे. FMB च्या प्रमुख वरोनिका स्क्वोर्त्सोवा यांनी इस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) मध्ये याची घोषणा केली आहे.
वैज्ञानिकांना आता अंतिम मंजूरीची प्रतिक्षा
स्कवोर्त्सोवा यांनी सांगितले की,’ हे कॅन्सरवरील संशोधन अनेक वर्षांपर्यंत चालले होते. ज्यात गेल्या तीन वर्षांत केवळ मँडेटरी प्री-क्लीनिकल स्टडीजलाच समर्पित होते. व्हॅक्सीन आता वापरासाठी तयार होते. आम्ही आता अधिकृत मंजूरी मिळण्याची वाट पाहात आहोत.’
त्यांनी सांगितले की प्री-क्लिनिकल ट्रायल्समध्ये लसीची सुरक्षेवर तसेच वारंवार वापरानंतरही तिच्या प्रभावशीलतेला दुजोरा दिलेला आहे. संशोधकांनी या दरम्यान ट्युमरचा आकार कमी आणि ट्युमरचा विकास खुंटल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय या अभ्यासात या लसीमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यात यशात वाढीचा संकेत मिळाला आहे.
अनेक प्रकारच्या कॅन्सर लसींवर काम सुरु
या लसीच्या सुरवातीचे टार्गेट कोलोरेक्टल कॅन्सर असणार आहे. त्यानंतर ग्लियोब्लास्टोमा (ब्रेन कॅन्सर) आणि विशिष्ट प्रकारचा मेलेनोमा उदा. ऑक्युलर मेलेनोमा ( एक प्रकारचा डोळ्यांचा कॅन्सर ) साठी लसी विकसित करण्याचे उद्दीष्ठ असणार आहे.या कॅन्सर प्रकरणातील लसी देखील प्रगतीवर आहेत. सध्या त्यांच्या एडव्हान्स टेस्ट सुरु आहेत.
१० वा इस्टर्न इकॉनॉमिक फोरम ३ ते ६ सप्टेंबरला व्लादिवोस्तोकमध्ये ‘The Far East: Cooperation for Peace and Prosperity’ विषयावर आयोजित केला होता. या व्यासपीठावर ७५ हून अधिक देश आणि क्षेत्रांच्या ८,४०० हून अधिक लोकांनी भाग घेतला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List