अर्जुन खोतकर यांच्याविरोधात गुन्हा
खाटीक समाजाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी जालना येथील आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर बारामती पोलिसांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे.
हिंदू खाटीक समाज संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुनील इंगुले यांनी खोतकर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. जालन्याचे काँग्रेस आमदार पैलास गोरंटय़ाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खोतकर यांनी या प्रवेशाला खाटकाची उपमा दिली होती. यातून खाटीक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List