येळकोट येळकोट जय मल्हार… जेजुरीचा खंडोबा गड दुमदुमला

येळकोट येळकोट जय मल्हार… जेजुरीचा खंडोबा गड दुमदुमला

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथे सलग सुट्ट्यांमुळे भाविक आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. कडेपठारच्या डोंगरातील खंडोबा व जेजुरी गडामधील खंडोबा या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी येळकोट येळकोटचा केलेल्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमून गेला होता. शुक्रवारपासूनच जेजुरीतील धर्मशाळा, लॉज, पुजाऱ्यांची घरे येथे भाविक मोठ्या संख्येने उतरले होते. उपाहारगृहे गर्दीने फुलली होती. या कालावधीत आर्थिक उलाढाल चांगली झाली.

कडेपठारच्या डोंगरातील खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येथेही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. डोंगरात हलकासा पाऊस सतत पडत आहे. डोंगराच्या परिसरात हिरवीगार वनराई बहरली असल्याने भाविकांबरोबर पर्यटकांची गर्दी झाली होती. आज श्रावणी सोमवार असल्याने कडेपठार मंदिर, खंडोबा गड व लवथळेश्वर मंदिरामध्ये भाविकांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सध्या खोबऱ्याचा भाव चारशे रुपये किलोच्या पुढे गेल्याने भाविकांकडून भंडार-खोबऱ्याची उधळण कमी प्रमाणात होत आहे.

ढोल-ताशा पथकाची गडावर हजेरी
सार्वजनिक गणेशोत्सव तोंडावर आल्याने पुणे परिसरात सर्वत्र ढोल-ताशांचा नाद घुमू लागला आहे. विशेष म्हणजे अनेक ढोल-ताशा पथके जेजुरी गडावर येऊन ढोल-ताशांचा गजर करून देवापुढे हजेरी देत आहेत. आज कोथरूड येथील ब्रह्मचैतन्य ढोल-ताशा पथकाने जेजुरी गडावर येऊन ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणत ढोल-ताशांचा निनाद केला. या आवाजाने गडातील वातावरण भक्तिमय झाले. श्री मार्कंडे देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी पथकाचे स्वागत केले.

ऐतिहासिक लवथळेश्वर मंदिरात ग्रामस्थांची गर्दी
जेजुरी-सासवड रस्त्यावर असलेल्या प्राचीन लवथळेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी ग्रामस्थांची दिवसभर गर्दी होती. पौराणिक कथेनुसार लव ऋषींचे येथे वास्तव्य होते. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी याच शंकराच्या मंदिरात बसून लवथळती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची प्रसिद्ध असलेली आरती तयार केली. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याने या मंदिराचा जिर्णोद्धार केला. ऐतिहासिक पेशवे तलावाच्या काठी असलेल्या बल्लाळेश्वर मंदिरातही महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;