कोयताधारी विद्यार्थ्यांचे पोलिसांपुढे आव्हान! दहशत वाढण्याची भीती

कोयताधारी विद्यार्थ्यांचे पोलिसांपुढे आव्हान! दहशत वाढण्याची भीती

कधी वाहनांची तोडफोड करण्यासाठी, तर कधी दोन गटांतील राड्यामध्ये, तर कधी लूटमार, खंडणीसाठीही कोयता उगारला जात असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्येही कोयत्याची ‘क्रेझ’ वाढत चालली असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. मित्रांना धाक दाखवणे, दहशत निर्माण करणे किंवा सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ टाकणे यासाठी विद्यार्थी कोयत्याचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.

चिंचवड-काळभोरगनर येथील आयआयबीएम इन्स्टिट्यूट, जेट इंडिया कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८ ऑ गस्ट रोजी कॉलेजमधील बाथरूममध्ये धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारीचा प्रकार घडला. कॉलेजच्या गेटवरच दोन तरुणांनी विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडले. त्यानंतर हे विद्यार्थी जामिनावर बाहेरही आले. तर, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत पुणे-अहिल्यानगर महामार्गावर लघुशंकेसाठी कार थांबविली असता, दुचाकीवर आलेल्या दोघांनी चालकाच्या गळ्याला चाकू लावून आणि महिलांना कोयत्याचा धाक दाखवून ८५ हजाराचे दागिने लुटले होते.

शाळकरी विद्यार्थी, अल्पवयीन मुलांकडून गुन्ह्यांमध्ये होणारा कोयत्याचा बिनधास्त वापर ही चिंताजनक बाब ठरत आहे. लहानसहान वादातून होणाऱ्या भांडणात सर्रासपणे शाळकरी विद्यार्थ्यांकडून कोयत्यासारख्या हत्यारांचा वापर होत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांनीही कोयत्याचा वापर केल्याचे समोर आले आहे. मात्र, अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन हे गुन्हेगार कारागृहातून सहज बाहेर येऊन आणखी गुन्हे करण्यास धजावत असल्याचे दिसून येत आहे. शाळकरी वयात मुले एखाद्या प्रभावाखाली पटकन येतात. चित्रपट, मालिका किंवा सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून ते आकर्षित होतात. पालकांकडून योग्य मार्गदर्शन न झाल्यास ही ‘क्रेझ’ चुकीच्या दिशेला वळू शकते.

विद्यार्थ्याच्या सॅकमध्ये कोयता
शिरूर शहरातील बाबूरावनगर येथे पेट्रोलिंगदरम्यान तपासणी करणाऱ्या पोलिसांना अल्पवयीन शाळकरी मुलाच्या सॅकमध्ये धारदार कोयता सापडला. पकडलेल्या मुलाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कोयता गैंग’ म्हणून अकाऊंट असल्याचेही तपासात उघडकीस आले होते. ६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हावर आलेल्या अल्पवयीन मुलाची तपासणी केली असता, त्याच्या सॅकमध्ये हा कोयता आढळल्यामुळे खळबळ उडाली होती.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वतीने ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाअंतर्गत पोलीस आयुक्तालयाअंतर्गत शाळांमध्ये दर १५ दिवसांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये ‘गुड टच-बॅड टच’, वाहतूक नियम जनजागृती, बालगुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना, सोशल मीडियाचा घोकादायक वापर, गुन्हेगारी प्रवृत्तीपासून रोखणे याबाबत माहिती दिली जाते.
– डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त, गुन्हे

शाळांमध्ये समुपदेशन गरजेचे
शाळांमध्येदेखील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना समुपदेशनाद्वारे योग्य सल्ला देण्याची गरज आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्याशी सतत संवाद साधणे आवश्यक आहे. अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनीही पोलिसांना माहिती द्यावी. कोयत्याची ‘क्रेझ’ रोखण्यासाठी सामाजिक संस्थांनी जनजागृती मोहिमा राबविण्याची गरज आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या
आरोग्याबाबत जागरूक राहायला किंवा निरोगी राहायला सर्वानाच आवडतं.त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात. या सवयींपैकी एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर...
झोपताना उशाजवळ लिंबाच्या तुकड्यावर थोडंसं मीठ लावा अन् ठेवा, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे नक्कीच मिळतील
Maratha Reservation – खाऊ गल्ली, हॉटेल बंद, पाण्याचीही सोय नाही, सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे; जरांगेंची महायुतीवर सडकून टीका
Photo – मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले
अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ भिरकावण्याचा प्रयत्न, दोघे पोलिसांच्या ताब्यात
फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळे; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Photo – आरक्षणाच्या मागणीवर मराठा ठाम, लाखोंच्या जनसमुदायाने मुंबई व्यापली