अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ले परतवून लावा! कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांचे आवाहन; रील स्टार अथर्व सुदामेला पाठिंबा

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ले परतवून लावा! कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांचे आवाहन; रील स्टार अथर्व सुदामेला पाठिंबा

रील स्टार अथर्व सुदामे याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे त्याच्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर त्याने तो व्हिडीओ डिलीट केला. मात्र, धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे चिंताजनक आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत, असे मत कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. ‘या लढ्यात मी अथर्वसोबत आहे,’ असेही ते म्हणाले.

अथर्व सुदामे याने हिंदू-मुस्लिम ऐक्यावर भाष्य करणारा गणेशोत्सव स्पेशल व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, टीका झाल्यानंतर त्याने व्हिडीओ डिलीट केला. या प्रकरणात अॅड. असीम सरोदे यांनीही अथर्वला पाठिंबा दर्शविला आहे.

गणेशोत्सवातील सर्वधर्म समभावाच्या रीलवरून वाद, ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर पोस्ट डिलिट; अथर्व सुदामेला कलाकार व मान्यवरांचा पाठिंबा

‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात अथर्व सुदामेचे कौतुक केले होते,’ असे नमूद करून अॅड. सरोदे म्हणाले, ‘अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले आहेत. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी त्याला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असताना राज ठाकरे आणि मनसेने अथर्वच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. माझे राज ठाकरे यांच्याबरोबर बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडीओ पुन्हा पोस्ट करावा. कोण काय करतेय ते बघूया !’

लोकांचे व्यापक मत हे अथर्वच्या बाजूने आहे. धार्मिक सलोखा, एकात्मता, बंधुभाव ही संविधानातील मूल्ये सांगणारा तो व्हिडीओ आहे. त्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होत आहे. त्यामुळे या व्हिडीओवर आक्षेप घेणाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. अशा धमक्या देणे योग्य नाही.

अॅड असीम सरोदे कायदेतज्ज

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये तरुणांचा उद्रेक! संसद पेटवली, काठमांडू लष्कराच्या हाती!! पोलिसांच्या बेछूट गोळीबारात 20 ठार, 400 जखमी… हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये तरुणांचा उद्रेक! संसद पेटवली, काठमांडू लष्कराच्या हाती!! पोलिसांच्या बेछूट गोळीबारात 20 ठार, 400 जखमी…
सरकारचा हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात नेपाळमध्ये आज मोठा उद्रेक झाला. सरकारच्या मनमानीला वैतागलेल्या तरुणाईला सोशल मीडियावरील बंदीचे निमित्त मिळाले...
उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक, व्हीप नसल्यामुळे खासदार ‘राजा’, एनडीएला क्रॉस वोटिंगचा धोका
आधार कार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरणार, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश
देशात प्रथमच डिजिटल जनगणना, दोन वर्षांची मुदत; 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती
अजित पवारच जलसंपदा घोटाळय़ाचे सूत्रधार, तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप
आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी एकवटणार
हिंदुस्थानी आयटी क्षेत्रात लाखो नोकऱ्या जाणार, अमेरिकेबाहेर काम देणाऱ्या कंपन्यांवर 25 टक्के टॅरिफचा बडगा