गोराईत खवळलेल्या समुद्रात बस फसली, घबराट… पर्यटकांनी उड्या मारल्या, सुदैवाने मोठा अपघात टळला

गोराईत खवळलेल्या समुद्रात बस फसली, घबराट… पर्यटकांनी उड्या मारल्या, सुदैवाने मोठा अपघात टळला

सलग सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गोराई बीचवर गेलेल्या पर्यटकांची मिनी बस खवळलेल्या समुद्रात फसली आणि प्रचंड घबराट पसरली. बसमध्ये सहा ते सात पर्यटक होते. उंच लाटांच्या तडाख्यात बस समुद्रात खेचली गेली. नंतर बराच वेळ ती बस लाटांवर हेलकावे खात राहिली. बसमधील पर्यटकांनी मच्छीमार आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर उडय़ा मारल्या. सुदैवाने मोठा अपघात टळला. रविवारी सायंकाळी हा थरार घडला.

लाटांच्या तडाख्यात पर्यटकांच्या बसला चारही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढले. नंतर ती बस हेलकावे खात खोल समुद्राच्या दिशेने जात होती. त्यामुळे पर्यटक मदतीसाठी आरडाओरड करीत होते. यावेळी स्थानिक मच्छीमार, अग्निशमन दल आणि जीवरक्षकांनी धाव घेतली. त्यांच्या मदतीनंतर पर्यटकांनी बसमधून उडय़ा मारल्या. नंतर पर्यटकांना सुरक्षितरीत्या किनाऱयावर आणण्यात आले आणि समुद्रात अडकलेली बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आले. बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

संपूर्ण रात्रभर बस समुद्रातच

पर्यटकांची वेळीच सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र लाटांचा जोराचा मारा सुरूच राहिल्याने बस समुद्रातून बाहेर काढणे मुश्कील बनले. त्यामुळे संपूर्ण रात्रभर ती बस समुद्रातच अडकून पडली होती. अखेर सोमवारी सकाळी दोरीच्या सहाय्याने बस समुद्राबाहेर काढली. बंदी असतानाही चालकाने बस चौपाटीवर कशी नेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेधा इंजिनीयरिंगचा दंड माफ; जप्त केलेली वाहनं, यंत्रसामुग्रीही परत करण्याचे आदेश! रोहित पवारांनी विधानसभेतील उत्तराचे पुरावे केले सादर मेधा इंजिनीयरिंगचा दंड माफ; जप्त केलेली वाहनं, यंत्रसामुग्रीही परत करण्याचे आदेश! रोहित पवारांनी विधानसभेतील उत्तराचे पुरावे केले सादर
इलेक्ट्रोल बाँडच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मदत करणाऱ्या मेधा इंजिनीयरिंग कंपनीचा ९० कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचा मुद्दा चांगलाच पेटला...
पित्तावर करा ‘हे’ घरगुती खात्रीशीर उपाय, वाचा
नेपाळच्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर ‘Gen-Z’ आंदोलकांचा कब्जा, 5 मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान दुबईला पळण्याच्या तयारीत
गेल्या 11 वर्षात देशात वाढली साक्षरता, पाच राज्य झाली 100 टक्के साक्षर
स्कॉर्पिओ-मोटारसायकल अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेड येथील घटना
कर्नाटकात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; 8 जखमी, 21 जणांना अटक
Health Tips – लिवरच्या उत्तम आरोग्यासाठी ‘ही’ फळे खायलाच हवीत, वाचा