हिंदुस्थानी आयटी क्षेत्रात लाखो नोकऱ्या जाणार, अमेरिकेबाहेर काम देणाऱ्या कंपन्यांवर 25 टक्के टॅरिफचा बडगा

हिंदुस्थानी आयटी क्षेत्रात लाखो नोकऱ्या जाणार, अमेरिकेबाहेर काम देणाऱ्या कंपन्यांवर 25 टक्के टॅरिफचा बडगा

हिंदुस्थानातून आयात होणाऱया वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेने आणखी एक बॉम्ब फोडण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेबाहेर काम देणाऱया कंपन्यांवर 25 टक्के कर लावणारे आऊटसार्ंसग विरोधातील विधेयक सिनेटसमोर मांडण्यात आले आहे. याचा जबर फटका हिंदुस्थानच्या आयटी क्षेत्राला बसणार असून, लाखो नोकऱया जाण्याची भीती आहे.

सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर बर्नी मोरेनो यांनी हे विधेयक मांडले आहे. ‘हॉल्टिंग इंटरनॅशनल रिलोकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट’ (हायर ऍक्ट) अशा आशयाचे हे विधेयक आहे. अमेरिकन कंपन्या आऊटसार्ंसग करून परदेशातील स्वस्त कामगारांना सामावून घेतात. त्यामुळे अमेरिकी तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. अमेरिकी कंपन्या आपल्या देशातील नागरिकांऐवजी परदेशी कामगारांना प्राधान्य देत असतील तर त्यांना त्याची किंमत कराच्या रुपात मोजावी लागेल. अमेरिकी मध्यमवर्गाला नोकऱ्या आणि चांगले भविष्य देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असेल, असे मोरेनो म्हणाले.

आमचे पदवीधर इथं नोकऱ्यांसाठी संघर्ष करत आहेत. पण, ग्लोबल प्रतिमेच्या मोहापायी राजकारणी आणि प्रचंड नफ्यासाठी कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी वर्षानुवर्षे चांगल्या नोकऱया परदेशात घालवत आहेत. आता ते दिवस संपले आहेत.’

विधेयक मंजूर झाल्यास…

  • 31 डिसेंबर 2025 नंतर 25 टक्के कर लागू होईल.
  • अमेरिकन कंपन्यांना परदेशी लोकांना कामावर ठेवणे महाग होईल.
  • हिंदुस्थानातील आयटी कंपन्यांना अमेरिकेतून मिळणारी कामे पूर्णपणे बंद किंवा कमी होतील.
  • हिंदुस्थानातील आयटी निर्यातीला 100 अब्ज डॉलरचा फटका बसेल.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;