Jolly LLB 3 चित्रपट रिलीजपूर्वी कायद्याच्या कचाट्यात; अक्षय कुमार, अर्शद वारसीला कोर्टाचे समन्स

Jolly LLB 3 चित्रपट रिलीजपूर्वी कायद्याच्या कचाट्यात; अक्षय कुमार, अर्शद वारसीला कोर्टाचे समन्स

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या बहुचर्चित जॉली एलएलबी-3 चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 19 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.

सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये वकिली व्यवसायाचे चुकीचे चित्रण केल्याचा आणि न्याय व्यवस्थेचा खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पुण्याच्या सिव्हिल कोर्टाने अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना समन्स बजावले असून 28 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पुण्यातील वकील वाजद खान, भारत बिडकर आणि गणेश म्हास्के यांनी जॉली एलएलबी-3 चित्रपटविरुद्ध याचिका दाखल केली आहे. वकिली व्यवसायाचे अपमानास्पद चित्रण आणि न्याय व्यवस्थेचा अपमान केल्याचा आरोप करत याचिकाकर्त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

जॉली एलएलबी-3चित्रपटामध्ये एका दृश्यात न्यायाधीशांसाठी मामू हा शब्द वापरण्यात आला असून त्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. या याचिकेचा विचार करत न्यायालयाने अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना समन्स पाठवून आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, जॉली एलएलबी-3 हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सुभाष कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आलोक जैन आणि अजित अंधेरे हे निर्माते आहेत. अक्षय कुमार, अर्शद वारसी हे प्रमुख भूमिकेत असून सौरभ शुक्ला, अमृता राव, हुमा कुरेशी, अन्नू कपूर, बोमन इराणी यांनीही या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 2013 मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’ आणि 2017 मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी-2’ चा सिक्वेल आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;