Parbhani News – मुसळधार पावसामुळे परभणीत नदीला पूर , अनेक गावांचा संपर्क तुटला

Parbhani News – मुसळधार पावसामुळे परभणीत नदीला पूर , अनेक गावांचा संपर्क तुटला

परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपल्याने नदीला पूर आला आहे. आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी वडगाव या गावांचा पुरामुळे संपर्क तुटला असून गावामध्ये कुठलीही वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. तीनही नद्यांचे पाणी पुलावरून वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक दहा या रस्त्यावरील पुलाची निविदा मंजूर असून कंत्राटदाराने अद्यापही काम सुरू केले नसल्याने गावकऱ्यांचा सार्वजनिक बांधकामात विभागाच्या कारभारावर रोष आहे. गेल्या वर्षी गावाचा संपर्क तुटल्यामुळे उपचाराअभावी एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळत नसल्यामुळे मृत्यूस जबाबदार कोण ?असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

  • शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे कातनेश्वर महसूल मंडळात अतोनात नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई करू नये .
    (सोपान मोरे सामाजिक कार्यकर्ते)
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या! बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही....
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?
विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!