ग्रामीण भागातील उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘ग्रामोद्योग भरती पुरस्कार’ वितरण सोहळा 20 ऑगस्ट रोजी राजभवन येथे होणार आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. रक्षा वागे (ठाणे), संदेश दळवी (रत्नागिरी), दर्शन यादव (धुळे) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर चार उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्य खादी मंडळाचे सभापती रवींद्र साठे, डॉ. पी. अनबलगन, दीपेंद्र सिंह कुशवाह, गीतांजली बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List