पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशीम मुसासह तिघे ठार,संसदेत चर्चा सुरू झाल्यावर सरकारचा दावा
‘ऑपरेशन सिंदूर’वर आज संसदेत चर्चा सुरू झाल्यानंतर काही वेळातच कश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याच्या बातम्या येऊन थडकल्या. या तिघांमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशीम मुसाचा समावेश असल्याचा दावा करण्यात येत असून विरोधकांनी मात्र त्यावर शंका घेतली आहे.
श्रीनगरजवळच्या दाचीगाम येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यात हाशीम मुसा यांच्यासह त्याचे साथीदार जिब्रान आणि हमजा अफगाणी मारले गेले. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही यास दुजोरा दिला.
विरोधकांना संशय
विरोधी खासदारांनी यावर शंका घेतली. आम्ही सकाळीच पहलगामवर प्रश्न उपस्थित केला आणि दुपारी त्यांनी दहशतवाद्यांना मारले? असा संशय काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी व्यक्त केला. ऐऱ्यागैऱ्याला मारून मास्टर माईंड म्हणत आहेत. लक्ष भलतीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका पप्पू यादव यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List