स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजप आमदारांनी सर्वपक्षीय आघाडीसोबत लढवावी; अभिजित पाटील यांची ऑफर

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजप आमदारांनी सर्वपक्षीय आघाडीसोबत लढवावी; अभिजित पाटील यांची ऑफर

निष्क्रिय लोकप्रतिनिधी म्हणून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मतदारांनी डावलल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका भाजपचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी परिचारक यांच्यासोबत न लढविता विरोधी सर्व पक्षीय आघाडी सोबत लढवावी अशी खुली ऑफर माढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर श्रमिक पत्रकार संघाने वार्तालापाचे आयोजन केले होते. यावेळी अधिवेशनात मांडलेले प्रश्न, स्थानिक स्वराज्य निवडणुका, साखर कारखाना आदी विषयांवर आमदार पाटील यांनी मोकळेपणाने चर्चा केली.

आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये पहिल्याच वर्षात विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने मनावर दडपण होते. मात्र, मिळालेल्या वेळेत विधानसभेच्या कामकाजाची काही पुस्तके वाचून काढल्याने सभागृहाचे कामकाज समाधानकारक चालवू शकल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. पंढरपूर नगरपरिषदेवर भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची 40 वर्षे सत्ता आहे. मात्र तीर्थक्षेत्र म्हणून ज्या सेवा सुविधा निर्माण व्हायला हव्यात, त्या देण्यास परिचारक हे असमर्थ ठरले आहेत. परिचारक यांच्या निष्क्रिय राजकीय कारकीर्दीमुळे मतदारांनी त्यांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार आवताडे यांनी भाजपच्या पराभूत आमदारासोबत आघाडी न करता पंढरपूरच्या विकासासाठी सर्व पक्षीय आघाडी सोबत यावे असे मी त्यांना खुले निमंत्रण देत असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

या अधिवेशनात मतदार संघातील व राज्यभरातील 175 प्रश्न तारांकितसाठी टाकले होते. सीना माढा उपसा सिंचन, कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजना, जिल्हा दूध संघ, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, शक्तीपीठ महामार्ग, आषाढी यात्रा प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव असे अनेक महत्वाचे विषय मांडता आल्याचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले. जिल्हा दूध संघाचा विषय मांडला, बरखास्त झालेले संचालक मंडळ चुकीच्या पद्धतीने आदेश रद्द करून पुन्हा कार्यरत राहिले. दूध संकलन बंद झाले असून जागा विकण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे तो विषय मांडला, जमिनीच्या तुकडे बंदीबाबत आम्ही 9 आमदारांनी लक्षवेधी मांडली होती. महसूल मंत्र्यांनी तुकडे बंदी उठवण्याची घोषणा केली, त्याचवेळी गुंठेवारी बाबत सुधारणा आवश्यक होती त्याबाबत सभागृहात चर्चा झाली, सहभाग घेतला. वकील संरक्षण कायद्याची मागणी सभागृहात करतानाच नवीन वकिलांना स्टायपेंड दिला जावा, अशी मागणी केली.

सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षे उत्पादकांना नुकसान भरपाई ची मागणी केली, 7 कोटी पैकी साडे चार कोटी थकीत होते, ते अधिवेशन काळातच मिळवून देता आले. सीना – माढा योजनेच्या लाभक्षेत्रात माढा तालुक्यातील बावी सारखे गाव गेल्या 20 वर्षांपासून वंचित होते, त्याचा समावेश करता आला, 550 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. 20 वर्षे जुने पंप आहेत, ते दुरुस्त करण्याकडे सभागृह आणि जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागात बटण नावाचे ड्रग्स अगदी कुठेही टपरीवर सुद्धा मिळते, यातून तरुण पिढ्या बरबाद होतात. यावर सभागृहात बोललो, त्यावर कायदेशीर कारवाई करू असे आश्वसन मिळाले. कुस्ती क्षेत्रात डोपिंग चा घातक विषय आहे, अनेक मल्ल कुस्ती जिंकण्यासाठी डोपिंगचा आधार घेतात हे त्यांच्या आरोग्यासा ठी घातक आहे, तसेच कुस्तीच्या निकोप स्पर्धेसाठी नुकसानकारक आहे, त्यामुळे पैलवान पिढीच्या हितासाठी डोपिंगवर सभागृहात बोललो. डोपिंग टेस्ट महाग आहे, अशा कुस्तीना परवानगी देताना डोपिंग टेस्ट सक्तीची करण्याची मागणी केली.

शक्तीपीठ महामार्गाला बहुतेक सर्व आमदारांचा विरोध आहे, मात्र नेमका मुद्दा कोणी मांडत नाही, मी उदाहरणासह सभागृहात शक्तीपीठ मार्गाचा विषय मांडला. विटे सारख्या गावात 30 लाख रुपये एकर भाव असताना शासन नुकसान भरपाई म्हणून 14 ते 17 लाख देत असेल तर शेतकरी विरोध करणारच आहेत, या मुद्द्याकडे लक्ष वेधले. मी माढा विधानसभेचा आमदार आहे, त्यामुळे माझे प्राधान्य माढा विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांना असेल, त्याचवेळी महाराष्ठ्र विधानसभेत मी आहे, त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील प्रश्नांवरही मी बोलू शकतो, आणि पंढरपूर शहराचेही प्रश्न मांडल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नॉनव्हेज प्रेमींनो सावधान! जास्त चिकन खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार नॉनव्हेज प्रेमींनो सावधान! जास्त चिकन खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
जगभरात मोठ्या प्रमाणात लोक चिकन खाण्याचे शौकीन आहेत. चविष्ट आणि पौष्टिक असल्यामुळे ते नॉन – व्हेज प्रेमींच्या थाळीतील एक आवडता...
पावसाळ्यात नाकही आजारी पडते! जाणून घ्या 5 सामान्य समस्या आणि त्यावरील उपाय
Ratnagiri News – उदय सामंतानी एमआयडीसी विरोधकांचे पुरावे जाहीर करावे, संघर्ष समितीप्रमुखाचे आव्हान
Nagar News – जिल्हा नियोजन निधीत गैरव्यवहार? अजित पवार यांचे चौकशीचे आदेश
IND vs ENG 4th Test – सर डॉन ब्रॅडमन यांना जमलं नाही ते शुभमन गिलने करून दाखवलं, 148 वर्षांच्या इतिहासातील विक्रम
मुंबई-वाराणसी इंडिगो विमान दोन तास धावपट्टीवरच, प्रवाशांमध्ये संताप
जन सुरक्षा कायद्याची भीती नाही ती राबवणाऱ्यांची भीती; निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे परखड मत