Ratnagiri News – उदय सामंतानी एमआयडीसी विरोधकांचे पुरावे जाहीर करावे, संघर्ष समितीप्रमुखाचे आव्हान
वाटद एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांचे जे काही पुरावे पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाकडे आहेत ते त्यांनी जाहीर करून टाकावेत म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल, असे थेट आव्हान वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष समिती प्रमुख प्रथमेश गवाणकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना केले. खंडाळा येथे शनिवारी एमआयडीसी समर्थनासाठी झालेल्या सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांवर आरोप केले होते, त्याला प्रथमेश गवाणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हा लढा पालकमंत्र्याविरूद्ध नाही. हा लढा प्रशासन राबवत असलेले धोरण आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या सभोवती राहून सर्वसामान्य जनतेच्या जमिनी कवडीमोल दराने विकणाऱ्या दलालांविरूद्ध आहे, असे प्रथमेश गवाणकर यांनी स्पष्ट केले. काही जण एमआयडीसी बाधित शेतकऱ्यांची खोटी खरेदीखते बनवून जेलवारी करून आल्याचा आरोप गवाणकर यांनी केला.
कालच्या समर्थन सभेला विविध आमिषे दाखवूनही लोकं घराबाहेर पडली नाहीत. म्हणून वरवडे, जयगड, सैतवडे आणि जांभारी गावातून माणसं आणावी लागल्याचा आरोप प्रथमेश गवाणकर यांनी केला आहे. पत्रकारांनी त्या सहा गावांत घराघरात जाऊन सर्व्हे करावा म्हणजे कळेल विरोध किती आहे तो असेही गवाणकर म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List