WCL 2025 – आधीही खेळलो नाही, आताही खेळणार नाही.. INC Vs PNC सामन्यावर शिखर धवनच तडाखेबंद उत्तर

WCL 2025 – आधीही खेळलो नाही, आताही खेळणार नाही.. INC Vs PNC सामन्यावर शिखर धवनच तडाखेबंद उत्तर

एकीकडे टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे World Championship of Legends (WCL) 2025 चा रणसंग्राम सुरू आहे. या स्पर्धेत हिंदुस्थान चॅम्पियन्ससह दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, वेस्ट इंडिज चॅम्पियन्स, इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स या सहा संघांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा सध्या हिंदुस्तान-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आल्यामुळे चर्चेत आली आहे. याच दरम्यान टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि हिंदुस्थान चॅम्पियन्स संघाचा फलंदाज शिखर धवनने पुन्हा एकदा तडाखेबंद वक्तव्य करत पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे.

हिंदुस्थान चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यामध्ये 20 जुलै रोजी सामना खेळला जाणार होता. परंतु या सामन्यातून शिखर धवन, हरभन सिंह, युसूफ पठान, इरफान पठान आणि सुरेश रैना यांनी माघार घेत पाकिस्ताविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे आयोजकांनी सामनाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा शिखर धवनने यासंदर्भात भाष्य करत आपले  स्पष्ट केले आहेत. पत्रकाराशी संवाद साधत असताना त्याला विचारण्यात आलं की, तुम्ही हिंदुस्थान-पाकिस्तान या संभावित सेमी फायनलमध्ये खेळणार का? त्यावर शिखर धवन म्हणाला की, “भाई, तुम्ही चुकीच्या ठिकाणी हा प्रश्न विचारत आहात. जर तु हे विचारत आहेस, तर तुला वाटतं का मी याच उत्तर देईन. आणि जर मी आधी खेळलो नसेन तर, आताही खेळणार नाही.” असं म्हणत शिखर धवनने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे.

IND vs ENG 4th Test – रविंद्र जडेजा की बेन स्टोक्स; कपिल देव यांनी सांगितले जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूच नाव

WCL 2025 स्पर्धेच्या गुणतालिकेचा विचार करता सध्या पाकिस्तान चॅम्पियन्स संघ 7 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. पाकिस्तान चॅम्पियन्सने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत तर, हिंदुस्थान चॅम्पियन्सविरुद्धचा त्यांचा सामना रद्द झाला. या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स, तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज चॅम्पियन्स, पाचव्या क्रमांकावर इंग्लंड चॅम्पियन्स आणि सहाव्या क्रमांकावर हिंदुस्थान चॅम्पियन्स या संघांचा समावेश आहे. हिंदुस्थान चॅम्पियन्सने 3 सामन्यांपैकी दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे त्यांच्या खात्यात 1 पॉइंटचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;