IND vs ENG 4th Test – सर डॉन ब्रॅडमन यांना जमलं नाही ते शुभमन गिलने करून दाखवलं, 148 वर्षांच्या इतिहासातील विक्रम

IND vs ENG 4th Test – सर डॉन ब्रॅडमन यांना जमलं नाही ते शुभमन गिलने करून दाखवलं, 148 वर्षांच्या इतिहासातील विक्रम

हिंदुस्थानच्या युवा ब्रिगेडचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडच्या धर्तीवर आपल्या लयबद्ध फलंदाजीने सर्वांनाच आश्चर्याचा सुख:द धक्का दिला आहे. सध्या सुरू असलेल्या मँचेस्टर कसोटीमध्येही त्याने 103 धावांची शतकीये खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या मालिकेतील त्याचं हे ऐतिहासिक असं चौथ शतक ठरलं आहे. याबाबतीत त्याने कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला असून सर डॉन ब्रॅडमन यांना गिलने मागे टाकलं आहे.

शुभमन गिलने चौथ्या कसोटीमध्ये दुसऱ्या डावात 238 चेंडूंचा सामना 12 चौकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी केली. त्याला जोफ्रा आर्चरने बाद केलं. यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन भोपळाही फोडू शकले नाहीत. त्यामुळे केएल राहुल (90) आणि शुभमन गिल यांनी संघाची सर्व सुत्र आपल्या हाती घेत भक्कम भागी केली. या सामन्यातील आज शेवटचा दिवस असून सामना अनिर्णीत सुटण्याची शक्यता आहे. असे असले तरी शुभमन गिलने आपल्या खेळाची दखल साऱ्या जगाला घ्यायला लावली आहे. त्याची 103 धावांची खेळी ऐतिहासिक ठरली आहे. कर्णधार म्हणून संघाच नेतृत्व करताना अनेकांनी शतके ठोकली आहेत. परंत शुभमन गिलचा विषय थोडा वेगळा आहे. 148 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार म्हणून खेळत असताना पहिल्याच मालिकेत चार शतके ठोकणारा शुभमन गिल पहिलाच कर्णधार ठरला आहे.

WCL 2025 – आधीही खेळलो नाही, आताही खेळणार नाही.. INC Vs PNC सामन्यावर शिखर धवनच तडाखेबंद उत्तर

शुभमन गिलच्या पूर्वी कर्णधार म्हणून खेळत असताना पहिल्याच मालिकेत तीन शतके ठोकण्याचा विक्रम पाच खेळाडूंनी केला आहे. वॉर्विक आर्मस्ट्रँग, डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ या खेळाडूंनी कर्णधार म्हणून खेळत असताना पहिल्याच मालिकेत तीन शतके ठोकली आहेत. परंतु आता शुभमन गिल एकमेव असा कर्णधार ठरला आहे, ज्याने पहिल्याच मालिकेत चार शतके ठोकली आहेत. विशेष बाब म्हणजे मालिकेतील एक सामना अद्याप बाकी आहे. शुभमन गिलचा फॉर्म पाहता शतकांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर मँचेस्टरमध्ये तब्बल 34 वर्षानंतर एका हिंदुस्थानी फलंदाजाने शतक ठोकण्याची किमया साधली आहे. यापूर्वी 1991 साली सचिन तेंडुलकरने याच मैदानावर शतक ठोकले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND Vs ENG 4th Test – रविंद्र जडेजा-वॉशिंग्टनची झुंजार खेळी; इंग्लंडला अक्षरश: रडवलं, मँचेस्टर कसोटी अनिर्णित IND Vs ENG 4th Test – रविंद्र जडेजा-वॉशिंग्टनची झुंजार खेळी; इंग्लंडला अक्षरश: रडवलं, मँचेस्टर कसोटी अनिर्णित
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळल्या गेलल्या मँचेस्टर कसोटीमध्ये रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने धमाकेदार प्रदर्शन केलं आहे....
डांबर उतरवताना टँकरमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
महिलांच्या सक्षमीकरणाचा सरकारचा ढोल फुटला! शहापूरमध्ये गरिबी आणि भुकेकंगालीमुळे आईने पोटच्या तीन गोळ्यांना विष घालून मारले
नॉनव्हेज प्रेमींनो सावधान! जास्त चिकन खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
पावसाळ्यात नाकही आजारी पडते! जाणून घ्या 5 सामान्य समस्या आणि त्यावरील उपाय
Ratnagiri News – उदय सामंतानी एमआयडीसी विरोधकांचे पुरावे जाहीर करावे, संघर्ष समितीप्रमुखाचे आव्हान
Nagar News – जिल्हा नियोजन निधीत गैरव्यवहार? अजित पवार यांचे चौकशीचे आदेश