फूड पॅकेटवर फक्त एक्सपायरी डेट नाही तर ‘या’ 3 गोष्टी सर्वात आधी पाहा; अन्यथा होईल नुकसान
आजकाल लोक बाजारातून खूप विचारपूर्वकपणे वस्तू खरेदी करतात, मग ते अन्न असो किंवा घरातील इतर कोणतेही सामान. तसेच आजकाल पॅकेज्ड फूड खरेदी करणे किंवा ऑनलाईन मागवण्याचा ट्रेंड देखील खूप आला आहे. परंतु जेव्हा पॅकेज्ड अन्नपदार्थांचा विचार केला जातो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण एक्सपायरी डेट आधी पाहतात.आणि मगच ती वस्तू खरेदी करतात. आपल्याला वाटते की जर एक्सपायरी डेट बरोबर असेल तर उत्पादन देखील ठीक असते, सुरक्षित असते. परंतु बर्याच वेळा असे घडते की वस्तूची तारीख बरोबर असते, परंतु त्याची गुणवत्ता खराब निघण्याची शक्यता असते. यामुळे केवळ पैशाचे नुकसान होत नाही तर आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही केवळ तारीखच नाही तर इतर काही महत्त्वाच्या गोष्टी देखील काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे असते.
एक्सपायरी डेट व्यतिरिक्त या गोष्टी देखील नक्की पाहा
1. इंग्रीडिएंट्स लिस्ट
जेव्हा तुम्ही कोणतेही पॅकेज्ड अन्न खरेदी करता तेव्हा प्रथम त्याच्या घटकांची यादी तपासा, ही यादी बहुतेकदा पॅकेज्डच्या मागे किंवा त्याच्या एका साईडला छापलेली असते. त्यामध्ये त्या अन्नात काय काय इंग्रीडिएंट्स असतात ते सांगितले जाते. जर तुम्हाला यादीत ही नावे दिसली – -रिफाइंड शुगर, हाइड्रोजेनेटेड ऑयल, मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG), प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा आर्टिफिशियल फ्लेवर, तर अशा उत्पादनांपासून दूर रहा, या गोष्टी जास्त काळ खाल्ल्याने शरीराला, विशेषतः मुले आणि वृद्धांना हानी पोहोचू शकते. नेहमी अशी उत्पादने खरेदी करा ज्यात नैसर्गिक घटक असतील, जसं की होल ग्रेन, देशी तूप, मध किंवा तुम्ही ऐकलेला कोणताही मसाला.
2. न्यूट्रिशन लेबल वाचायला विसरू नका
बऱ्याचदा आपण या भागाकडे दुर्लक्ष करतो, पण हाच कॉलम सर्वात महत्वाची माहिती देतो. पॅकेटवर न्यूट्रिशन फैक्ट्सचा एक छोटासा बॉक्स निश्चितपणे दिलेला असतो. त्यावरून उत्पादनात किती कॅलरीज, फॅट, शुगर, फायबर, प्रोटीन आणि कार्ब्स आहेत हे समजते
जर तुम्हाला निरोगी अन्न खायचे असेल, तर असे उत्पादन निवडा ज्यामध्ये कमी शुगर, कमी ट्रान्स फॅट आणि जास्त फायबर आणि प्रोटीन असतील. न्यूट्रिशन लेबल तुम्हाला कोणते उत्पादन चांगले आहे हे ठरवण्यास मदत करते. जर तुम्ही दोन प्रोडक्ट्समध्ये गोंधळलेले असाल, तर या बॉक्सच्या मदतीने त्यांची तुलना करणे सोपे जाते तसेच आरोग्यासाठी चांगले असलेले प्रोडक्टस् खरेदी करू शकता.
3. FSSAI क्रमांक आणि मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स
प्रत्येक पॅकेज्डवर FSSAI क्रमांक लिहिलेला असतो, ज्यावरून हे समजते की प्रोडक्टला सरकारने मान्यता दिली आहे की नाही. जर एखाद्या प्रोडक्टच्या पॅकेजवर हा क्रमांक नसेल, तर ते खरेदी करणे धोकादायक असू शकते. तसेच, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स वाचा, म्हणजे ते कोणत्या कंपनीने बनवले आहे, ते कुठे बनवले आहे आणि केव्हा बनवले आहे. यामुळे तुम्हाला कळेल की उत्पादन किती नवीन आहे आणि कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवता येईल.
तसेच या गोष्टी लक्षात ठेवा:
1. जर पॅकेटचा सील तुटलेला असेल तर तो उत्पादन कधीही खरेदी करू नका.
2. जर पॅकेटमध्ये ओलावा दिसला किंवा त्यातून विचित्र वास येत असेल तर समजून घ्या की ते खराब झाले आहे.
3. आता अनेक उत्पादनांमध्ये एक QR कोड देखील असतो, त्याला स्कॅन करून तुम्ही त्याचा रिपोर्ट, रिव्यू किंवा ट्रॅकिंग करू शकता.
4. बनावट किंवा अज्ञात ब्रँडच्या वस्तू घेणं टाळा, विशेषतः जेव्हा अन्नपदार्थ किंवा कोणतीही खाण्याची गोष्ट खरेद करत असाल तेव्हा
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List