कोलेस्ट्रॉलपेक्षाही भयंकर ‘ही’ गोष्ट; वाढू शकतो हृदयविकाराचा धोका, काय करू शकता उपाय?
कोलेस्ट्रॉल (cholesterol) हा हृदयाचा जीवघेणा शत्रू मानला जातो. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. परंतु ट्रायग्लिसराइड्स (Triglycerides) हा कोलेस्ट्रॉलसारखाच एक घाणेरडा पदार्थ आहेत, जो नसा ब्लॉक करून हृदयाला नुकसान पोहोचवू शकतो. हृदयविकाराला कारणीभूत असलेलं सर्वात मोठं घटक कोलेस्ट्रॉल मानलं जातं. हे खरं आहे की तुमच्या रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी तुमच्या रक्तप्रवाहावर परिणाम करू शकते आणि हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट स्ट्रोकचा धोका वाढवू शकते. कोलेस्ट्रॉलसारखाच आणखी एक घाणेरडा पदार्थ तुमच्या शरीराला गंभीर हानी पोहोचवू शकतो. हा घाणेरडा पदार्थ म्हणजे ट्रायग्लिसराइड्स होय. चांगल्या आरोग्यासाठी त्याच्या पातळीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. रक्तातील ट्रायग्लिसराइड्सच्या वाढलेल्या पातळीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. रक्तातील त्याच्या पातळीतील वाढ तुमच्या वाईट खाण्यापिण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैली यामुळे होते. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आहारात सुधारणा करून आणि सक्रिय जीवनशैलीद्वारे हा धोका कमी करू शकता.
ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय?
ट्रायग्लिसराइड्स हे तुमच्या रक्तात आढळणारी चरबी किंवा फॅट (लिपिड) आहे. जेव्हा तुम्ही काहीही खाता, तेव्हा तुमचं शरीर लगेचच कोणत्याही कॅलरीजचं ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतर करतं. ट्रायग्लिसराइड्स तुमच्या पेशींमध्ये साठलं जातं. कॅलरीज बर्न करण्याऐवजी जास्त कॅलरीजचं सेवन केल्यास ट्रायग्लिसराइड्स वाढू शकते. विशेषत: हाय कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्लायने ते वेगाने वाढतं. वैद्यकीय भाषेत या समस्येला हायपरट्रिग्लिसरिडेमिया (hypertriglyceridemia) म्हणतात.
ट्रायग्लिसराइड्सची पातळी काय असावी?
ट्रायग्लिसराइड्सची नॉर्मल रेंज 150 मिलीग्रॅम प्रति डेसीलिटर (mg/dL) पेक्षा कमी किंवा 1.7 मिलीमोल प्रति लिटर (mmol/L) पेक्षा कमी असावी.
थोडं जास्त – 150 ते 199 mg/dL (1.8 ते 2.2 mmol/L)
जास्त – 200 ते 499 mg/dL (2.3 ते 5.6 mmol/L)
खूप जास्त – 500 mg/dL किंवा अधिक (5.7 mmol/L किंवा अधिक)
ट्रायग्लिसराइड्सची पातळी मर्यादित ठेवण्यासाठी काय करावं?
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.
नियमित व्यायाम ट्रायग्लिसराइड्सचा धोका कमी करू शकतो आणि शरीरातील ‘चांगलं’ अर्थात गुड कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो. दररोज पायऱ्या चढा किंवा ब्रेक असताना वॉक करा.
जास्त गोड खाऊ नका
साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स खाणं टाळा. साधे कार्बोहायड्रेट जसं की साखर आणि मैदा किंवा फ्रुक्टोज असलेले पदार्थ ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढवू शकतात.
वजन कमी करा
ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमचं वजन कमी केलं पाहिजे. लक्षात ठेवा की अतिरिक्त कॅलरीज ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतरित होतात आणि फॅटच्या स्वरूपात शरीरात साठवल्या जातात. कॅलरीज कमी केल्याने ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होईल.
हेल्दी फॅट खा
जेवणात ऑलिव्ह ऑईल आणि कॅनोला ऑईल वापरा. लाल मांसाऐवजी ओमेगा -3 फॅटी ऍसिडवाले मासे जसं की मॅकेरल किंवा सॅल्मन मासे खाण्याचा प्रयत्न करा.
दारू पिऊ नका
मद्यपानावर मर्यादा आणा. अल्कोहोलमध्ये कॅलरीज आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि ते ट्रायग्लिसराइड्स वेगाने वाढवतं. तुम्हाला गंभीर हायपरट्रिग्लिसरिडेमिया असल्यास दारू पिणं पूर्णपणेच टाळा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List