पावसात मुलांची काळजी घेताना ‘या’ 5 चुका टाळा

पावसात मुलांची काळजी घेताना ‘या’ 5 चुका टाळा

पावसाळा हा ऋतू जितका आनंददायक असतो, तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण करणारा ठरू शकतो, विशेषतः लहान मुलांसाठी. हवामानातील अचानक बदल, उष्णता आणि आर्द्रतेतील चढ-उतार यामुळे लहानग्यांना सहज आजार होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी या काळात अधिक जागरूक राहून मुलांची काळजी घ्यायला हवी. परंतु अनेकदा काही लहान पण महत्त्वाच्या चुका मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात.

1. पावसात भिजणे अनेक वेळा अनावश्यक असते. काही वेळा मुलांचे कपडे पूर्णपणे भिजत नाहीत, फक्त किंचित ओले होतात. अशा वेळी बऱ्याच पालकांना वाटते की कपडे बदलण्याची गरज नाही. परंतु अशा थोडक्याच ओल्या कपड्यांमुळेही सर्दी, ताप, खोकला यांसारख्या त्रासाला सुरुवात होते. त्यामुळे भिजले असोत वा थोडेसेच ओले असोत, मुलांचे कपडे वेळेत बदला हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

2. बर्‍याच पालकांना वाटतं की हलकासा पाऊस असला तर मुलांना बाहेर खेळू द्यायला हरकत नाही. पण हा गैरसमज आरोग्याला महागात पडू शकतो. पावसात उगम पावणारे सूक्ष्म जंतू आणि कीटक त्वचेशी संपर्क साधून अॅलर्जी, त्वचाविकार किंवा इतर संसर्गाचे कारण ठरतात. त्यामुळे हलक्या पावसातही मुलांना बाहेर जाण्यापासून रोखा किंवा त्यांच्यासाठी रेनकोट, गमबूट यांसारखी संरक्षणात्मक वस्त्रांची व्यवस्था करा.

3. थंड हवामानात थंड पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. विशेषतः लहान मुले थंड पाण्यामुळे त्वरीत आजारी पडतात. त्यामुळे पावसाळ्यात नेहमी कोमट पाण्याचा वापर करून मुलांना आंघोळ घालावी. यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि संसर्ग टाळता येतो.

4.पावसाळा म्हणजे मच्छरांचा मोसम. घरात आणि घराच्या आजूबाजूला साचलेले पाणी हे मच्छरांच्या प्रजननासाठी योग्य ठिकाण असते. या मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे घरी मच्छरदानी, रिपेलंट्स, मच्छरनाशक क्रीम्स किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरा. संध्याकाळच्या वेळी मुलांना फुल बाह्यांचे कपडे घालायला लावा.

5. पावसाळ्यात हातपाय वारंवार स्वच्छ धुणे, खाण्या-पीण्याची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. मुलांना गरम अन्न, ताजे फळे देऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. घराबाहेर खाणं टाळा. बर्फाचे पदार्थ, उघड्यावरचे फूड, अशा गोष्टींमुळे पोटदुखी, जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, युद्धविरामावरून होणार रणसंग्राम; इंडिया आघाडी फायरिंगच्या तयारीत आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, युद्धविरामावरून होणार रणसंग्राम; इंडिया आघाडी फायरिंगच्या तयारीत
संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारची कसोटी लागणार आहे. देशातील महत्त्वाच्या व जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर ‘इंडिया’ आघाडी सरकारवर...
गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय प्रफुल्ल लोढावर हनी ट्रपचा आरोप, एकनाथ खडसे यांच्या दाव्याने खळबळ
हिंदुस्थानचा विरोध झुगारून ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे धरण, 12 लाख कोटी खर्च; काम सुरू
ईडी ही ड्रोन किंवा सुपरकॉप नाही! ऊठसूट चौकशी, कुठेही नाक खुपसणे थांबवा, मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेला फटकारले
नगरविकास खात्याने नवी मुंबईची वाट लावली, गणेश नाईकांचा मिंध्यांवर निशाणा
मुंबईत एका दिवसात अडीच लाख किलो चिकन-मटण फस्त, गटारीचा झणझणीत बेत
लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलणार, तीन वर्षांत साडेसात हजार प्रवाशांच्या मृत्यूनंतर जाग