महाराष्ट्रात सक्तीने हिंदी भाषा लादणे खपवून घेतले जाणार नाही; आदित्य ठाकरे यांचा इशारा

महाराष्ट्रात सक्तीने हिंदी भाषा लादणे खपवून घेतले जाणार नाही; आदित्य ठाकरे यांचा इशारा

शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारी आदेशाची रविवारी दुपारी आझाद मैदानात ‘होळी’ करण्यात आली. या आंदोलनातून मराठी माणसाच्या एकजुटीची वज्रमूठ दिसून आली. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. महाराष्ट्रात सक्तीने हिंदी भाषा लादणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रविरोधी भाजप सरकारने पहिलीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा – हिंदी – शिकणे सक्तीचे केले आहे. महाराष्ट्रात सक्तीने हिंदी भाषा लादणे खपवून घेतले जाणार नाही आणि राजकारणापलीकडे जाऊन, अशा लहान मुलांवर हा भार लादणे हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात तिसरी भाषा सक्तीच्या करण्याचा जीआर आम्ही आज जाळला. कोणतीही नवीन भाषा/विषय पाचवीच्या पुढे असलेल्या विद्यार्थ्यांची निवड असली पाहिजे आणि कोणतीही भाषा सक्तीने लादणे सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;